विश्वास आणि अपेक्षा


विश्वास ही अशी गोस्ट आहे की आपण दुसर्‍या व्यक्तीवर किंवा वस्तुवर काही चिंता किंवा विचार न करता त्याकडून आपल्याला हव तस काम होईल अशी केलेली अपेक्षा. खर तर माझा विश्वास सहजासहजी कोणावर बसत नाही. आणि मी अपेक्षा देखील करत नाही. अपेक्षा म्हणजे आपण दुसर्याकडून केलेली इच्छा. या दोनिहि गोस्टी पासून मी स्वतल दूरच ठेवण्याचा प्रयन्त करतो. कारण  रूपालीचा अनुभव घेतल्या नंतर कधी कोणावर विश्वास बसलाच नाही. मी अपेक्षा या करता करत नाही की आपली अपेक्षा जर पूर्ण झाली नाही तर मग वेदना देखील आपल्यालाच होतात. मग मन बेचैन होत. मनाला समजावं खूप अवघड असत.

याचा मला चांगलाच अनुभव आहे. मन लवकर एखधि गोस्टीला ताबडतॉप मानत नाही. आणि जर त्याने कधी कोणाला आपले मानले आणि त्याने जर आपली अपेक्षा भंग केला तर अजुनच अवघड होऊन  बसत. असा मला अनुभव येऊन सुध्धा मी पुन्हा एक गोड मुलीच्या प्रेमात पडलो. ती अगदीच छान. माझ्या सारख्या फालतू मुलासोबत ती अगदी प्रेमळ पणे वागायची. मला जशी हवी होती तशी. माझ म्हणन समजून घेणारी, मी जरी तिच्यावर चिडलो तरी ती शांत राहणारी  मला समजून घेणारी.

माझ्या लहान भावा- बहीनीचा अभ्यास घेणारी, त्यांची काळजी घेणारी, त्यांवर माझ्या इतकेच  प्रेम करणारी. ती खूपच सुंदर आहे. तरी देखील तिला गर्व नाही. अशी आज माझ्याशी  चक्क  खोट   बोलली. असो चुक तर माझी होती ना. विश्वास आणि अपेक्षा केल्या. आज बोलन झाल्यावर मन अगदी सुन्न झाल  होत. तिला मी कधीच माझ्या मनतल सांगू शकणार नाही. पण काय करू तिच्या सगळ्या गोस्टी आपल्या वाटतात . ती माझ्या साठीच आहे अस वाटत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.