वेळापत्रक


वेळापत्रक तशी नवीन गोष्ट नाही. एकतर आपण आयुष्यात स्थिर स्थावर व्हायला वयाशी तीशी गाठतो. पुढे आर्थिक अन वेळेचे महत्व समजायला अधिक वर्षे गमावतो.

अर्ध्याहून अधिक आयुष्य वेळेचे महत्व समजण्यात जातात. मग उरलेल्या वेळेत घरगुती जबाबदाऱ्यात जाते. अनेक स्वप्न आपण पहात असतो. मग ते कधी पूर्ण करणार?

इथे वेळापत्रक किती महत्वाचे आहे, याचा अंदाज यावा. विचार करा आपलं सरासरी आयुष्य पन्नास-साठ जरी पकडलं तरी आपण निम्मं आयुष्य आताच गमावले आहे. निम्मं आयुष्य झोपण्यात व झोपेतून उठून आवरण्यात जाणार!

नोकरी/व्यवसाय करण्यासाठी जी वाहतूक करणार त्यात आयुष्याची काही वर्ष गमावणार. थोडक्यात सरासरी दर तासात आपण केवळ १० मिनिटे आर्थिक कमाईसाठी वापरतो.

अन कमाई कधी खर्च करणार? हाहा! यासाठी वेळापत्रक महत्वाचे आहे. सोपं गणित सांगतो. म्हणजे हे अनुभव घेऊन बोलत आहे. सकाळचा चार तास वेळ स्वतःसाठी काढू शकलो तर आपला दिवस सुरळीत जातो.

उठल्यानंतर पहिले चार तास

चार तास ह्यासाठी की, सकाळचा व्यायाम, दिनचर्या पूर्ण करण्यास साधारण तासभर जातो. पुढील तासभर ईमेल/सोशल मीडिया/वर्तमानपत्रसाठी देऊ शकतो. पुढील तासभर दिवसाचे नियोजन करण्यासाठी वा कालच्या दिवसाचा आढावा घेण्यासाठी देऊ शकतो.

पुढील एक तास चिंतन करण्यासाठी वा घरच्यांसाठी काढला तरी त्यांचाही दिवस आनंदायी जाऊ शकतो. खरं तर सकाळचे चार तासाचे नियोजन करण्याचे दैनंदिन धकाधकीत अतिशय अवघड आहे.

पण प्रयत्न केला तर अशक्य नक्कीच नाही. मलाही सुरवातीला अवघड गेलेले. सकाळी दिवसाचे नियोजन जर केले तर दिवसातील अनेक गोष्टीतील वेळ वाचतो. नाहीतर दिवस जाऊनही कामे अपूर्ण राहतात!

हे विसरलो! ते विसरलो! मग पुढे अनेक नसलेले प्रश्न उभे राहतात. मग ते सोडवण्यासाठी अधिक वेळ खर्च करावा लागतो.

देवाने सर्वांना २४ तास दिले आहेत. मग अंबानी अब्जधीश होतात. अन आपण रोजच्या अडचणीत आयुष्य खर्च करतो. असे का होते?

यासाठी वेळापत्रक बनवा. व पालन करा. अन पहा! स्वप्न पूर्ण होतील! वेळ वाया घालणे हे पैसे वाया घालवण्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.

चला तर मग वेळेला त्याचे महत्त्व देऊयात! जास्ती जगूयात. भविष्यावर फारसा विश्वास न ठेवता वर्तमानात जगूयात! प्रयत्न केलं तर काय अशक्य आहे? बाकी बोलूच!

,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.