व्यसन


विश्वातील बहुतांश लोकांना कोणते न कोणते व्यसन जडलेले असतेच. कदाचित आश्चर्य वाटेल! परंतु, खरे आहे. साधारणतः ज्या सवयीचा, मग ती कोणतेही असो, त्या सवयीचा अतिरेक झाला की त्याला ‘व्यसन’ असे संबोधतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नेहमी वाईटच असतो.

अनेकांना दर थोड्या वेळाने मोबाईल चाळण्याची सवय असते. ती सवय नंतर इतकी वाढते की, चुकून कधी मोबाईल विसरला किंवा आपल्या जवळ नाही अस लक्षात आले की ह्यांचा ‘जीव’ कासावीस होतो. मन बैचेन होते. अनेकांचे असे ‘फेसबुक’ बद्दल, तर अनेकांचे ‘टीव्ही’बद्दल असते. या गोष्टींमध्ये इतके रममाण होतात, की जणू हेच काय ते विश्व वाटू लागते. सिगारेट, दारू किंवा तंबाखू ही जितकी व्यसने घातक असतात. त्याच सम प्रमाणात ही नवीन युगातील नवीन व्यसने घातक ठरू शकतात.

थोडक्यात त्या गोष्टीसाठी त्यांचा जीव वेडावतो. स्वतःवरच ताबा सुटतो, इतके देहभान हरपून जातात. की बाहेर पडण्यासाठी खुपच कष्टप्रद होवून बसते. अनेकांचा, क्रिकेटचा सामना पाहतांना ‘बीपी’ वर खाली होतो. जस जसा सामना रंगायला लागतो. तस् तशी त्याची मजा येण्या-ऐवजी एक अनामिक दबाव ह्यांच्यावर वाढू लागतो. जे सहन करू शकतात, ते टिकतात. नाहीतर, भयंकर आपत्ती ओढवून बसतात. काही यातून मार्ग काढू शकतात. पण सामान्यतः यातून त्यांना एक प्रकारचा जो आनंद मिळतो. त्याच्यातच ‘मुक्ती’ शोधतात. ती ‘सवय’ कधी गुलाम बनवते याचा त्या व्यक्तीला अंदाज त्या ‘अतिरेकी’ सवयीचे दुष्परिणाम जाणवू लागल्यावर लक्षात येतात. थोडक्यात तात्पर्य एवढेच की, सवयीचे ‘व्यसन’ होवू न देणे इतकेच.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.