व्यायाम


अनेकदा अनेक कल्पना आपल्या डोक्यात येतात. पण कधी वेळेअभावी तर कधी आळसामुळे ठरवलेली गोष्ट पूर्ण करता येत नाही. खरं तर या विषयावर खूप आधीच बोलणार होतो. पण अशाच एका गोष्टीला वाव देऊ शकत नव्हतो म्हणून थांबलेलो! गेले चार दिवसांपासून व्यायाम सुरु केला आहे. खूप दिवसांनंतर ही इच्छा पूर्ण होते आहे.

अगदी आठवीत असल्यापासून व्यायामाची आवड होती. गावाकडे सर्वात जास्त आकर्षण कसले असेल तर ते व्यायामाचं आणि कुस्तीचं! दहावी बोर्डाची परीक्षा चालू असेपर्यंत व्यायाम चालू होता! परीक्षा संपली आणि अनियमिततेचा जो नियमितपणा सुरु झाला तो आतापर्यंत चालू होता. माझ्या अनुभवातून एक गोष्ट मी शिकलो आहे. काही हवं असेल तर त्यात सातत्य हवं. शरीर हे मंदिर असते! त्याची योग्य देखभाल घेतली तर त्याची फळ देखील चांगली मिळतात. निरोगी शरीर हे निरोगी मनाला पर्यायाने एक चांगलं आयुष्य जगण्याला कारणीभूत ठरते.

आधी १०० सकाळ संध्याकाळ जोर वगैरे होत. डंबेल्स मग ५ पाउंड ते २५ पौंडापर्यंत होते. व्यायाम बंद झाला. आणि तेही कुठे हरवले ते सापडत नाही. आता पुन्हा व्यायामात सातत्य राखण्याचा प्रयत्न आहे. पाच जोर मारणं आता अवघड जात आहेत. मग टप्याटप्याने वाढवायचे ठरवले आहेत! पाहुयात किती यश मिळतंय ते!


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.