शेवट


असो, फार काही बोलण्यात आता काही उरले असे वाटत आहे. आज दुपारी मी डीएमला भेटून आलो आहे. त्याने स्पष्टपणे सांगिलते आहे की, माझ्या ‘महान’ शिक्षणामुळे कंपनीच्या पे रोलवर घेणे शक्य नाही. खूपच बेकार वाटत आहे. सगळीच लढाई हरल्याप्रमाणे वाटत आहे. पण मला ते कंत्राट वाढवायला तयार आहेत. कंत्राट वाढवू चिंता नसावी अस म्हणाले. पण त्याचा काय उपयोग? मला नाही रहायचे. तिला मनातले सांगायचे तरी निदान मी कंत्राटवर नको. ती काय विचार करेल की मी, साधा कंत्राटवर असलेला. कुठे तरी तिच्या योग्य हव ना!

पाहूयात, एखादी नवीन कंपनी पाहिलं. कदाचित भेटेलही. पण हाच ‘डिप्लोमा’ अडचणीत आणणार. पुन्हा कंत्राट. मग ते ‘आगीतून फुफाट्यात’ सारख व्हायचे. तसं नको. पे रोलवर गेल्याशिवाय मी तिला काहीच सांगणार नाही. कशाला तिला डिस्टर्ब करायचे. एकूणच, आता दोन महिने राहिले आहेत. बस बहुतेक हाच ‘शेवट’ होणार दिसतो आहे. हा प्रत्येक दिवस तिच्या दर्शनात घालवायची इच्छा आहे. आज ती इतकी छान दिसते आहे ना. तिला पहिले की मूड पुन्हा येतो. जॉबची अडचण नाही. नवीन मिळून जाईल. पण तिच्याविना कसं राहता येणार? हे चार दिवस कसेबसे घालवले.

खर तर काय बोलायचे ठरवून आलो आहे. आज मी तिच्याशी दोन पाच मिनिटे तरी नक्की बोलेन. पुन्हा दोन महिन्यानंतर काय माहित कधी भेटेल की नाही? सोडा, आतापासून तो विचार का करायचा? आताचा सुवर्णकाळ कशाला गमावू? मला काय करावं तेच सुचत नाही आहे. नंतर बोलू..


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.