शोधू मी..


कुठे गेली यार ती! मी ना इतक्या ‘गाढवचुका’ करतो ना. माझा मलाच राग येत आहे. सकाळी ती कॅन्टीनमध्ये दिसली होती. आणि एकटी बसली होती. पण नेहमीप्रमाणे मी हिम्मतच नाही करू शकलो तिच्याशी बोलायची. आणि नंतर ती पुन्हा कुठे गायब झाली कुणास ठाऊक! अजूनही परतली नाही. मला खूप टेन्शन आल आहे. यार काय करू? डोके खूप दुखते आहे. सकाळपासून तिच्या डेस्ककडे पाहतो आहे. आज सुद्धा ती खूप छान दिसत होती. बोललो असतो तर काही फरक पडला नसता. आता दोन दिवस कसे जाणार? खरंच काही सुचेनासे झाले आहे.

कधी कधी वाटते तिला सांगून टाकावे की माझे तिच्यावर किती प्रेम आहे ते. पण, पुन्हा माझ्यातील आणि तिच्यातील जमीन अस्मानाचा फरक डोक्यात येतो. आणि सर्व मनातील मनातच राहते. मला तिला कुठल्याच परिस्थितीत गमवायचे नाही आहे. तिच्या सारखी छान, सुंदर, गोड या पृथ्वीवर असू शकते यावरच विश्वास बसत नाही आहे. सगळे स्वप्नच आहे की काय याची शंका येते. ती आहे तर जीवनाला अर्थ आहे. आज खूप बोर झाले आहे. सगळेच एकदम भकास वाटते आहे. मी सकाळी बोललो असतो तर या विचारांनी डोके हैराण झाले आहे. पण मग पुन्हा शंका येते माझ्यामुळे तिला त्रास तर होत नसेल. काल रात्रभर तिचा इतका विचार झाला ना! स्वप्नातही तीच! आणि समोर आली की माझे आपले सगळे फूस. माझे काही मित्र तिला सांगून टाक म्हणतात तर काही घाई करू नको. इतके दिवस जे प्रश्न वाटत नव्हते ते आता खूप मोठे प्रश्न वाटत आहेत. आणि आता ती नाही. कुठे गेली असेल? तिची वानरसेना आज विखुरलेली. मला ना काहीच सुचत नाही आहे. आपण नंतर बोलू..


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.