संकल्प


काही बोलण्याआधी सर्वांना ‘मराठी नववर्षाच्या’ हार्दिक शुभेच्छा. सर्वांना हे वर्ष सुखाचं आणि विकासाच जावो. आज म्हटलं, मागील वर्षाचा माझा हिशोब द्यावा. मागील वर्षात बऱ्याच गोष्टी घडल्या. मी दोन खोल्यांच एक घर घेतलं. मोठ्या कंपनीत नोकरी. उत्पन्नात वाढ. घरासाठी काही वस्तू खरेदी केल्या. त्याआधीच्या वर्षाच्या मानाने ५.४७% मिळकतीत वाढ झाली. खर्चाचा हिशेबात मात्र मागील वर्ष खरंच खूप वाईट अवस्था झाली आहे. मागीलवर्षी झालेला खर्च त्याधीच्या वर्षाच्या मानाने २९७% वाढ झाली आहे. दोन वर्षांपूर्वी बचत एकूण उत्पन्नाच्या २/३ अशा प्रमाणात होती. आणि मागील वर्षी बचत १.२/१० म्हणजेच उत्पन्नाच्या १२% एवढी होती. बाकीचा ८८% खर्च. मागीलवर्षी एक चांगली गोष्ट म्हणजे खाण्यापिण्याचे हाल कमी झाले. एकूण वर्षात १५% खर्च खाण्यावर आणि ७३% खर्च इतर गोष्टींवर आणि १२% शिल्लक. इतर खर्चात मी माझा प्रवास खर्च, कपडे, इतर सामान अशा गोष्टी टाकतो. थोडक्यात खाण्यावर न केलेला खर्च म्हणजे इतर खर्च. तस म्हणाल तर मी मागीलवर्षी काहीच फालतू खर्च केला नव्हता. पण खर्च २९७% वाढला. स्पष्टपणे बोलायचं झालं. तर माझा खर्च याधीच्या खर्चापेक्षा सव्वा लाखाने वाढला आहे.

दोन वर्षापूर्वी मोबाईल,युपीएस, ५०० जीबी ची एक हार्डडिस्क, स्कैनर, दोन पेन ड्राइव, वायरलेस हेडफोन, वायरलेस माउस. अशा फार महत्वाच्या नसणाऱ्या गोष्टी खरेदी केल्या होत्या. मागील वर्षी कोणताच खर्च केला नव्हता. असो, मागील वर्षभर दोन मराठी वर्तमानपत्र चालू ठेवली. एक मराठी ब्लॉग, त्यात १४१ नोंदी. ३ नवीन मित्र आणि ३ नवीन मैत्रिणी केल्या. त्यातली एक वगळता बाकीच्याशी माझी मैत्री चांगल्या प्रकारे आहे. मागीलवर्षी ठरवलेल्या आणि बोललेल्या गोष्टींपैकी ८ गोष्टी मी नाही करू शकलो. बाकी ५८ गोष्टी मी पूर्ण केल्या आहेत. मागील वर्षात मराठी वगळता इतर भाषेपैकी हिंदीत ११३ वेळा आणि इंग्लिशमध्ये ३८ वेळा मी बोललो आहे. काय करणार हिशेब बघितल्यावर खूप दुख: होत आहे. मराठी कट्टरवादी असून देखील मी हिंदीत इतक्या जास्त वेळा बोललो. क्षमा असावी. यावर्षी मी या घडलेल्या चुका पुन्हा घडू देणार नाही.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.