सरकार आणि आपण


सरकार म्हणजे कोण? हा प्रश्न बहुदा आपल्या देशातील १% देखील नागरिकांना कधी पडला नसेल. हा अज्ञानाचा विषय नाही तर हा लोकशाही व राजकारणाकडे दुर्लक्षण्याचा प्रकार आहे. राजकारणी चुकले यात शंका नाही. पण सामान्य माणूस कधी यावर विचार करत नाही. अथवा त्याला आहे त्या परिस्थिती मार्ग काढणे अधिक योग्य वाटते.

साधारण दोन वर्षांपासून मी राहत असलेल्या गृहनिर्माण संस्थेचा अध्यक्ष आहे. सुरवातीला माझ्या व्यवसाय नवीन असल्याने सोसायटीत लक्ष घालणे शक्य होत होते. परंतु नंतर कामाच्या व्यापात तितकेसे लक्ष देणे होत नाही. काही छोटे मोठे प्रश्न रेंगाळतात. प्रश्न अगदी शुल्लक असतो. परंतु, सभासदांना तो प्रश्न आपण सोडवू असे कधी वाटत नाही. त्याऐवजी हे काम संस्थेच्या कमिटीला आहे असेच अधिक वाटते.

सभासद, कमिटी अथवा अध्यक्ष यांच्यात फारसा फरक नाही. सभासदांना अध्यक्ष म्हणजे काहीतरी देवात्मा वाटतो. जो चुटकीसरशी त्यांच्या अडचणी सोडवतो. मध्यंतरी, दोन तीनदा पाण्याचे तर कधी विजेचे प्रश्न निर्माण झालेले. मी ते मनपाच्या अधिकारांशी व महावितरणच्या अभियंत्याच्या सहकार्याने सोडवले. खरं तर प्रश्न समजावून देण्यापलीकडे मी कोणतेच काम केले नव्हते. परंतु, तेंव्हापासून अनेक जणांना हा गैरसमज निर्माण झाला. कधीकधी विचार केल्यावर हेच लक्षात येते की देशपातळीवरील असो वा गल्लीपातळीवरील विषय हे आपणही सोडवू शकतो. परंतु सरकार नावाची गोष्ट प्रत्येक प्रश्न सोडवेल यासाठी प्रत्येकजण हवालदिल असतो. अनेक प्रश्न जनता स्वतःच्या विवेकाने सोडवू शकते! जनता म्हणजेच सरकार आहे! हे कोण विचारात घेत नाही!


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.