सर्दी


परवा पासून ही सर्दी जाम मागे लागली आहे. बर सर्दी झाली ती सुद्धा उन्हाळ्यात. तसे मी कधीच आजारी पडत नसतो. पण यावेळी पडलो. अंगात जीवच नसल्याप्रमाणे वाटत आहे. काल दिवभर झोपून होतो. सर्दीमुळे थोडा खोकला आणि आवाजात बदल झाला. माझ्या डोळ्यात पाणी आले तरचं सर्दी होते. नाहीतर कितीही पाऊस असला तरी काही फरक पडत नाही. एकतर ‘मिनी आठल्ये’ पुन्हा आपआपल्या घरी गेल्यापासून जाम एकटेपणा जाणवतो आहे. त्यात आई देखील गावी गेलेली. मी इथे एकटाच. सगळ्यांची खूप आठवण येते.

दोन दिवसांपूर्वीची गोष्ट रात्री असल् विचित्र स्वप्न पडलं. स्वप्नात मी गावी होतो. माझे वडील मी जरा आलोच म्हणून बाहेर गेले. आणि खूप वेळ झाला तरी घरी आलेच नाहीत. मी शोधायला म्हणून बाहेर पडलो तर मला देखील भेटले नाहीत. मग अचानक स्वप्नात एका पोलिसानी दोन कवट्या हातात दिल्या. आता तो पोलीस कसा आला कुणास ठाऊक. मला काहीच सुचत नव्हते. मी तडकन घरी आलो तर वडील घरी. मला पाहून म्हणाले ‘कुठे होतास रे?’. मग काय माझी झोपच उडाली. उठून पहिले तर रात्रीचे साडेतीन वाजलेले. तसचं बसून मारुती स्तोत्र म्हटले. तेव्हापासून मग, माझ मलाच खूप खजील झालं. परवा तो ‘शिक्षणाच्या आईचा घो’ पहात असतांना एक रडका सीन पाहून गंगा यमुना आल्या. मग झाली सर्दी.

काल ब्लॉग लिहितांना सुद्धा डोळे पाणावले आणि पुन्हा सर्दी वाढली. असो, डोक दुखते आहे. यार ही सर्दी येतांना, खोकला आणि डोकेदुखी का आणते कुणास ठाऊक? या भुवया आहेत ना तिथेच जरा जास्त दुखत आहे. पण काळजी नसावी. माझ्याकडे यावर जालीम उपाय आहे. म्हणजे सर्दी झाल्यावर मी थंड पदार्थ खाल्ले की सर्दी खल्लास. आता हा माझा अनुभव आहे. कदाचित माझा उपाय बघितला की जाम हसू येईल. पण अनुभवाचे बोल आहे. कधी जमल्यास प्रयत्न करून बघायला हरकत नाही. आज इथेच थांबतो. सर्दीमुळे काहीच सुचत नाही आहे. बाकी बोलूच!!!


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.