सवयीची गुलामी


मला गप्पा मारण्याची सवय आहे. दिवसातून एकदा तरी मी कोणाशी ना कोणाशी गप्पा मारल्या शिवाय राहावतच नाही. तसाच संगणकावर बसून काम कारण ही देखील सवय आहे. मागील वर्षी मी माझ्या कोकणातल्या काकाकडे तीन दिवस गेलो होतो. सगळ छान होत. पण तीन दिवस संगणक शिवाय कसे काढले देव जाणे. संगणक किती मोठा आणि जीवनातला घटक बनला आहे हे त्यावेळी मला कळले. आता सवय आणि व्यसन यातला फरक सांगण्याचे तत्वज्ञान मी सांगण्याच्या भानगडीत पडणार नाही. आणि मी काही तत्ववेत्ता देखील नाही. आणि मुळात जास्त पकवत पण नाही.

माझ्या निगडीतील काकाकडे सकाळी अंघोळीला गरम पाण्याची सवय आहे. त्यासाठी तो कधी चूल तर कधी शेगडी वापरतो. जर पाणी गरम नसेल तर ते अंघोळ करण्याऐवजी फ़क़्त हातपाय धुतात. त्याच्या शेजाऱ्यांची कनिष्ठ कन्येला रोज सकाळी उठल्यावर बेड टी घ्यायची सवय. सकाळी ती बेड टी घेतल्याशिवाय ती दात देखील घासत नाही. तस ही सवय माझ्या एका कंपनीतील मैत्रिणीला देखील आहे. माझ्या आईची रोज दोनदा दात घासायची सवय. एकदा उठल्यावर आणि एकदा झोपण्याच्या आगोदर. माझ्या मित्राला सिगारेट ओढण्याची सवय आहे. त्याला दिवसातून एक दोनदा तरी सिगारेट ओढावीच लागते. नाही तर त्याला बेचैन होत.

माझ्या मावशीला तिचे ठरलेल्या त्या मराठी मालिका पाहण्याची सवय आहे. मी मुंबईत असताना एकदा ती कोणाशी तरी खूप गंभीरपणे फोनवर बोलत होती. नंतर कळलं की तिने आदल्या दिवशीचा एक भाग पहायचा राहून गेला होता. आणि म्हणून ती तीच्या मैत्रिणीशी काय झाल होत हे विचारण्यासाठी फोन केला होता. मावशी आणि काका रोज जेवताना मालिकेच्या भागावर चर्चाही करायचे. माझ्या मावस भावाचे आजोबांना क्रिकेटचे सामने पाहण्याची सवय. एखादा सामना टीव्हीवर चालू असताना कोणी ती वाहिनी बदलली की त्यांचा पारा चढायचा. वरील सगळ्या गोष्टीत मला तरी एक साम्य वाटत की, या सगळ्या सवयी आहेत. आणि आपण या सवयीत इतके गुंतून पडलो आहोत. की एखादा दिवस जरी यातील एखादी गोष्ट घडली नाही तर आपण अस्वस्थ होतो. मग कोणीही असो.

थोडक्यात आपण सवयीचे गुलाम होण्याच्या आसपास आहोत. कोणतीही सवय मग ती कितीही चांगली असो, अतिरेक केला की वाईटच घडते. मग त्या सवयीचे व्यसन बनते. माझे लहान भाऊ बहिण दिवसातून किमान सहा तास टीव्ही पाहतात, काका देखील किमान तितक्या वेळ टीव्ही पाहतो. कदाचित टीव्हीवरचे कार्यक्रम त्या दर्जाचे असतीलही. पण अतिरेक हा वाईटच असतो. मी दिवसातले सरासरी नऊ तास संगणकावर असतो. पण प्रमाणाच्या बाहेर गेल्यावर मी देखील संगणकाचा गुलामच होईल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.