साडेसाती


माझे आई आणि वडील भविष्य, ज्योतिष शास्त्राला मानतात. आज रात्री माझी आई म्हणाली की तुझी आजपासून साडेसाती संपली. आता त्यांच्या मते मागच्या काही वर्षांपासून ज्या अडचणी मला येत होत्या त्याचे मूळ कारण साडेसाती हे होते. मध्यंतरीपासून मला आर्थिक अडचणी अनेक येत आहेत. म्हणजे मला माझी मिळकतीपेक्षा अधिक खर्च होत आहे. आता मी फालतू खर्च काहीच करत नाही. तरीदेखील असे होते. आता साडेसाती किंवा भविष्य यामुळे मला अशा अडचणी येत आहेत अस मी मानत नाही. घर घेतल्यापासून माझ्या मिळकतीतील एक मोठा हिस्सा लोनच्या हप्त्यात जातो. दुसर म्हणजे मी करत असलेली इन्शुरन्स कंपनीत गुंतवणूक. आणि हो मुख्य म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके सरकार. ह्या सगळ्या गोष्टींमुळे खर्चच खर्च होत आहे. त्यामुळे मानसिक ताण तणाव निर्माण होतात.

यावेळी बँकेच्या गोंधळामुळे माझा पगार बहुतेक सोमवारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळी प्रथमच मला माझ्या लहान भावाकडून पैसे उसने घ्यावे लागले. आता या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो यालाच आई आणि वडील साडेसाती म्हणतात. माझा साडेसातीवर विश्वास नाही पण आई वडिलांवर आहे. जर त्यांना साडेसाती आहे अस मानल्यावर समाधान वाटत असेल तर मला साडेसाती मानायला काहीच हरकत नाही. शेवटी ते खुश राहिले तरच उपयोग. नाही तर एखाद्याच्या विश्वासाला आपण अंधविश्वास म्हणणे हे मला तरी काही बरोबर वाटत नाही. आणि नाही तरी माझ्या साडेसाती मानाने आणि न मानाने यामुळे काही माझ्या आर्थिक अडचणी काही कमी थोडीच होणार आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.