सुट्ट्यांचा देश


काल त्या महानगरपालिकेच्या ‘माहिती अधिकार’ विभागात अर्ज देण्यासाठी गेलो. बर, चिंचवडमधील ‘माहिती अधिकार’ विभागाचे कार्यालय चाफेकर चौकात. पण हेच ते कार्यालय हे त्या त्याच्या बाजूच्या रिक्षावाल्याला देखील माहित नव्हते. तासभर फिरल्यावर शेवटी मला त्या बसपास केंद्राच्या अधिकाऱ्याने सांगतले. बर जाऊनही काही फायदा झाला नाही. सुट्टी होती. तीन दिवस सुट्टी आहे. तशी मलासुद्धा तीन दिवस सुट्टी आहे. जगात सगळ्यात जास्त सुट्ट्या आपल्या देशात मिळतात अस मी एका वर्तमानपत्रात वाचाल होत. खर आहे. त्या बसपास केंद्रातील अधिकाऱ्याला विचारलं की ‘माहिती अधिकार’ कार्यालयाला कधी सुट्टी असते? तो म्हणाला दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. आणि रविवारी आठवड्याची सुट्टी. बर म्हणून महानगरपालिकेत गेलो तर तिथे देखील तेच. तिथून निघाल्यावर सुट्ट्याबद्दल विचार करत होतो. ते रेशनकार्ड वेळी देखील असंच. मागील वर्षी चौकशी गेलो की आता काय तर अमुक अमुक जयंती नंतर गेलो तर यांची पुण्यतिथी. नंतर काय तर दिवाळी. मग काय तर नाताळ. मस्त आहे.

मलाही आठवड्यातून दोन दिवस सुट्टी असते. वर्षात ५२ आठवडे असतात. म्हणजे मलाच १०४ दिवस हक्काच्या सुट्ट्या असतात. आणि त्यातून १२ राष्ट्रीय सणांच्या अधिक सुट्ट्या. म्हणजे ११६ दिवस सुट्ट्या वर्षात आहे. ३६५ दिवसातील मी २४९ दिवसच काम करीत असतो. म्हणजे वर्षातून ३०% दिवस सुट्ट्या असतात. आता बाकीच्या म्हणजे छोट्या सणांच्या किंवा इतर मिळणाऱ्या सुट्ट्या पकडलेल्या नाहीत. आता या सरकारी कर्मचाऱ्यांना यापेक्षा अधिक सुट्ट्या. दिवाळीची २० – ३० दिवस सुट्टी. महिन्यात चार रविवार आणि शनिवार अस पकडल तर वर्षातील अकराच महिनेच पकडू. कारण एक महिना दिवाळीचा. ६६ दिवस आठवड्याच्या सुट्ट्या. आणि दिवाळीचे ३० दिवस पकडले तर ९६ अजून, राष्ट्रीय सण, आजी आजोबांचे पुण्यतिथी आणि जयंत्या अस पकडून हे देखील शतकाच्या पुढे सुट्ट्या होतील. असो, आपल्या देशात असणारे सण, जयंत्या आणि पुण्यतिथ्या जेवढ्या आहेत, तितक्या मला वाटत नाही की जगातील इतर कोणत्या देशात असतील. असो, आपण कित्येक वर्षांपासून विकसनशील का आहोत याच्या काही कारणांपैकी हे देखील एक कारण असाव.

बर सुट्ट्या असण्याला कधीच कोणाचा विरोध नसतो. आणि विरोध नसल्याला देखील काही अस कारण नाही. काल, आज आणि उद्याही मला देखील सुट्टी आहे. आणि खर म्हणजे सुट्टीच्या दिवशी सुट्टीवर अस बोलण.. सोडा. आता माझ्या लहान बहिणीला तीच्या बारावीच्या परीक्षेनंतर दोन अडीच महिने सुट्टी आहे. खर तर सुट्टी हा शाळेत असल्यापासून निर्माण झालेला हक्क. आपला देश खऱ्या अर्थाने कुणाचा तर ‘सुट्ट्यांचा’ अस म्हणावं लागेल. देशाच्या स्वातंत्राचा दिवस आपण सुट्टी घेऊन साजरा करतो. आणि देश विकासाच्या आणाभाका घेतो. सुट्टी घेऊन कोणाचा विकास कसा काय घडू शकेल? पण ते आपल्या नियमांच्या आड येईल. बर आपल्या इथ होणारे ‘बंद’ पकडलेच नाही. नाही तर आकडा आणखीन वाढेल. बर जयंत्याबद्दल तर काही बोलूच नका. एक महापुरुषाची जयंती दोन दिवशी साजरी होते. आणि सुट्टी कोणालाही नाकारली तर तो देखील ‘लोकमान्य’ होईल. आता त्यावेळी लोकमान्य टिळकांनी त्यांचा स्वाभिमान दाखवला होता. आणि आपण त्यांच्या जीवनाच्या महत्वाच्या दिवसांची आपण सुट्टीसाठी उपयोग करून घेतो. बर निधर्मी राष्ट्र आहे ना. मग त्यामुळे आणखीनच सुट्ट्या वाढतात. काही कंपन्यांनी या सुट्ट्यांवर ‘एच्छिक’ मध्ये टाकल्या आहेत. कारण एखाद्या हिंदूला नाताळ किंवा त्याचा नसलेल्या सणाला सुट्टी घेऊन घरी झोपा काढण्याच्या पलीकडे काहीच काम नसते. आणि ज्यांचा तो सण आहे त्यांनाच त्याचे महत्व वाटते. बाकीचे आपले एक सुट्टी म्हणूनच पाहतात. यात स्वतःच काही नुकसान नसल्याने कशाला कोण विरोध वगैरे करील. आणि नव्या वादाला तोंड फोडिल? असो, आपला देश लोकशाहीपेक्षा अधिक ‘सुट्ट्यांचा’ आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.