सुपरमॅन आणि बॅटमॅन


सुपरमॅनचा जन्म बंदरात झाला. तसा सुपरमॅन शेवटी सुपरमॅनच. शिक्षण झाल्यावर एका झेपेत आफ्रिकेत. तिथ जाऊन आपली सुपर पॉवर वापरून तिथल्या सरकारला जेरीस आणले. आणि तिथल्या लोकांना न्याय दिला. मग काय पुढच्या झेपेत, भारतात!. इथं येऊन इकडे तिकडे आपल्या सुपर पॉवरने फिरला. आणि लोकांच्या प्रश्नात लक्ष घातले. तसे बहुतेक याच कामासाठी ह्या ‘मॅन’ लोकांचा जन्म असतो. आपल्या पॉवरने लोकांना गोळा करून त्यांना ‘सत्याग्रह’ नावाची एक सुपर पॉवर दिली. झालं, देशभरात आधीच इंग्रजी सत्तेविरोधात अघोषित युद्ध चाललेले. त्यात हा सुपरमॅन आणि त्याची सुपर पॉवर.

आता तुम्ही कधी पाहिलं आहे का? की, सुपरमॅन काही हत्याराने लढतांना? नाही ना! त्यामुळे त्याच्यासोबत निघालेले लोक स्वतःला देखील ‘सुपरमॅन’ समजून आपल्या तोंडाची सुपर पॉवर वापरून सरकारला ‘घायाळ’ करू लागले. आणि काय आश्चर्य. इंग्रजी सत्ताधारी देश द्यायला तयार झाले. पण मध्येच एक अलादिन उठला. आणि त्याचा चिराग घासला. आणि त्यातून एक जीन बाहेर निघाला. त्या जीनने देशात दंगे करायला सुरवात केली. सुपरमॅनची लोक आपल्या ‘तोंडाच्या’ सुपर पॉवरने त्याच्याशी मुकाबला केला. पण जीनही शेवटी जीनच. ऐकेच ना. शेवटी अलादिनाला सुपरमॅनने तीन ‘विष’ मागायला आणि त्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. अलादिनने पाहिली ‘विष’ देशाचे तुकडे करून त्यातील ‘पाक’ हिस्से त्याला हवे असे म्हणाला. दुसरी ‘विष’ तिथे जाण्याचा ट्रान्सपोर्टचा खर्च मागितला. त्याच्या जीनला तिकडे घेऊन जाण्यासाठी. आणि तिसरी ‘विष’ सुपरमॅनला मागायला सांगितली.

सुपरमॅनने फार काही नाही पाचशे कोट गिफ्ट म्हणून अलादिनला द्यायची भीष्म प्रतिज्ञा दिली. पण देशात त्याची प्रतिज्ञाच्या बाजूने कोणीच बोलेना. आधीच भुक्कड झालेला देश. सुपरमॅन ‘उपोषण’ नावाची पॉवर वापरून लोकांना ऐकायला भाग पाडले. आणि देश स्वतंत्र झाल्यावर, देशाचे पहिले ‘लोन’ काढले. आणि गिफ्ट अलादिनला मिळाले. आणि सुपरमॅनचा ‘लोनमॅन’ झाला. आता देशातील त्या लोनचे प्रत्येकातील ‘मॅन’, ‘वूमॅन’ आणि ‘कीड’वर त्याचे व्याज अडीच आणि मुद्दल अडीच हजार झाले आहे ती वेगळी गोष्ट. तेव्हापासून एक नवीन म्हण अस्तित्वात आली- ‘ऋण काढून सण करणे’. पण काही का असेना, सुपरमॅनने त्याची प्रतिज्ञा पूर्ण केली. त्याचाच राग धरून एका वेड्या माणसाने देशावर अजून सुपरमॅनचे ‘उपकार’ नकोत म्हणून त्याचा वध केला. आणि सुपरमॅन ‘अजरामर’ झाला. तिकडे अलादिन देखील देवाला ‘प्यारा’ झाला.

पुढे जाऊन काही वर्षांनी या देशाचा ‘बॅटमॅन’ पंतप्रधान बनला. पण त्या गिफ्टचा वापर करून तिकडे त्या जीनने शस्त्र खरेदी केले आणि त्याचा वापर करून देशावर हल्ला केला. बॅटमॅनने कुठलीच विनंती न करता त्याला प्रतिउत्तर द्यायला सुरवात केली. बॅटमॅन आता ‘बॅटलमॅन’ झाला. आपल्या देशाच्याच सैन्याची पॉवर वापरून जीनला लाहोर पर्यंत लाथाडले. जीन काकुळतीला आला. नाक घासायला तयार झाला. करार झाला आणि घातही. बॅटमॅनला ‘विष’ने मारले. आज त्या बॅटमॅनचा जन्म दिवस. आणि सुपरमॅनचा सुद्धा. एका मॅनने ‘गेलेले मिळवले’ आणि हिसकावणांर्याला चोपले. आणि दुसऱ्या मॅनने आहे ते दिले आणि नसलेले ‘लोन’ काढून दिले. जन्म दिवस एकच पण महानता भिन्न.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.