सेक्स


बस्स! नाव काढू नका. अगदी निषिद्ध विषय. ‘सेक्स’बद्दल बोलणे म्हणजे घाणेरडे. वाईट अगदी! लहान मुलांसमोर तर बिलकुलच नाही. असेच विचार येतात ना! माझ्याही मनात येतात. जसे पहाल तसे हे जग आहे. म्हटलं तर वाईट, म्हटलं तर चांगल. हा विषय ही तसाच. कदाचित, चर्चा देखील करणे ‘पाप’ वाटेल.

एक साधा, सरळ सोप्या गोष्टीचा विचार करा. आपण जी गाणी ऐकतो. कधी विचार केलाय. जी गाणी मोठ्या प्रमाणात गाजलेली आहेत. त्यातली बहुतांश गाण्याचे अर्थ काढून पहा. आपल्याला ‘शीला की जवानी’ चालते. पण ‘सेक्स’ शब्द चालत नाही. कोणत्या अभिनेत्रीने बिकनी सीन दिला, तर हे भले मोठे पानभर वर्तमानपत्रात त्याची बातमी. किसिंग तर आजकाल ‘नॉर्मल’ झालं आहे. सारस बागेपासून ते सुरस चित्रपटांपर्यंत.

छोटे कपडे घालून, विचित्र प्रकारचे अंग हलवून जे नृत्य केले जाते. त्याची आपण वाहवा करतो. पण ‘सेक्स’वर जाहीरपणे बोलायला तयार नसतो. बाकी कोणताही विषय काढा. तासनतास त्यावर गप्पा ठोकू. ओबामाने काय करायला पाहिजे पासून ते राज ठाकरेचे काय चुकले पर्यंत. पण हा विषय काढला की, घाणेरडे वाटते. मुलीं असे कपडे का घालतात? पुरुषांनी अस करायला पाहिजे. हे सगळे प्रश्न केवळ ‘न बोलण्यामुळे’ निर्माण झालेले आहेत. आई तर सोडाच पण वडीलही आपल्या मुलीशी किंवा मुलाशी या विषयावर बोलत नाहीत. बोलत असतील तर खरंच ती मुले भाग्यवान म्हणायला हवेत. आणि आम्ही अस सार्वजनिक ठिकाणी ‘चोरून पाहणे’ सोडून कधी पहातच नाही.

कधी धर्माच्या नावाखाली तर कधी ‘अश्लील’ म्हणून विषय टाळतो. खर तर आपण हे आपली ‘सेक्स’ विषयावर असलेली भीती आणि लज्जा लपवतो. पण या सगळ्यामुळे प्रश्न किती गंभीर स्वरूप घेत आहे. भविष्यकाळ गडद स्वरूप घेत आहे. याचा विचार एकतर आपल्या डोक्यात येत नाही आहे किंवा आपण तो विचार करणे टाळतो आहोत. कुठल्या संस्कृतीची जपणूक आपण करतो आहोत? ‘कामसूत्र’ हा आपल्याच पूर्वजांनी निर्माण केला आहे.

कदाचित आज आश्चर्य वाटत असेल? आज ह्याची ‘सटकली’ वगैरे की काय.. अस काही नाही. सध्याची परिस्थिती का निर्माण झाली? याचा जो तो आपआपल्या परीने विवेचन करतो आहे. हे मिडीयावाले, काय झालं नाय तरी ‘फुकटची बोंबाबोंब’ करून विषय सोडवण्या ऐवजी त्याचा गुंता अधिकच वाढवत आहेत. म्हणून माझ मत मांडले. कदाचित, अनावधानाने काही बोलले गेले असेल तर, माफी असावी.

, ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.