सोशल मीडिया आणि व्यवसाय


सोशल मीडिया हे डिजिटल विश्वाचा आविष्कार. मोबाईल नंतर जर जगाला जवळ आणणारी दुसरी गोष्ट म्हणजे सोशल मीडिया. आता त्याच्या वापरावर ते अवलंबून आहे. परंतु एक व्यावसायिक म्हणून त्याचा योग्य उपयोग केला जाऊ शकतो.

मी साधारण २०१६मध्ये माझ्या व्यवसायाला सुरवात केली. त्याआधी साधारण नऊ वर्षे नोकरी करत होतो. सुरवातीची काही वर्ष ब्लॉगिंग करायचो. मधल्या चार पाच वर्षात कामाच्या व आयुष्याच्या संक्रमातून जात होतो.

प्रत्येकजण व्यावसायिक आव्हानांना सामोरे जातो. ते अडथळे पार करावेच लागतात. सर्वात महत्वाची अडचण होती ग्राहकापर्यंत पोहोचायची. ती अडचण बऱ्यापैकी सोशल मीडियामुळे दूर झाली.

२०१६ च्या सुरवातीला ट्विटरवर अनेकजणांच्या ओळखी झाल्या. एक नवीन विश्वच उघडलं. तेंव्हापासून आजवर अनेकांशी संपर्क होऊ शकला. काहींना हा अनुभव फेसबुक वा अन्य सोशल वेबसाईवर आला असेल.

योग्य वापर केला तर नक्कीच फायदा होतो. हा स्वनुभव आहे. जगात एकूण पावणेदोन अब्ज वेबसाईट आहेत. त्यापैकी केवळ २१% वेबसाईट ह्या अद्यतनित/अपडेट होतात.

भारतात ५० कोटी मोबाईल वापरकर्ते आहेत. साधारण ४६ कोटी इंटरनेट वापरकर्ते आहेत. यापैकी निम्मे वापरकर्ते फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल मीडियाचा दैनंदिन वापर करतात. त्यामुळे आपला व्यवसाय सोशल मीडियावर आणणे क्रमप्राप्त आहे.

भारतीय सोशल मीडिया वापरकर्ते
भारतीय सोशल मीडिया वापरकर्ते

कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचे उत्तम साधन म्हणजे सोशल मीडिया. सोपा विचार करूयात! मी एका दिवसात किती लोकांना भेटू शकतात? किंवा एकाच वेळी किती लोकांना भेटू शकता? त्यासाठी लागणारा आर्थिक आणि वेळेचा खर्च ह्याहून खूप कमी खर्च सोशल मीडियाचा येतो.

प्रभावीपणे उपयोग अनेक नवी दालने उघडू शकतात. मी स्वतः देखील यातील अनेक मार्ग चोखंदळून पहात आहे. एक गोष्ट मात्र नक्की. आपला सोशल मीडिया हे वरदानच आहे. काही अतार्किक गोष्टी देखील घडू शकतात. परंतु आपण काळजी घेतली तर चिंतेचं कारण नाही.

शेवटी शस्त्र कोणतेही असो ते वापरणाऱ्यावर अवलंबून राहणार. चांगले नियोजन आणि त्यासोबतची कृती आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी उपयोगी पडू शकते.

अडचणी आणि संधी यातील दरी सोशल मीडियाद्वारे पूर्ण होऊ शकतात. बहुतांश लोक पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करतात. त्यात मुख्य अडचण ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक आणि वेळेच्या अफाट खर्चाची असते. जर थोडा व्यावहारिक विचार केला तर आपल्या व्यवसायासाठी हे फायद्याचे ठरू शकते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.