स्मार्टफोन चार्जिंगमधील अंधश्रद्धा


स्मार्टफोन चार्जिंगमधील अंधश्रद्धा हे नाव मजेशीर वाटेल. परंतु खरोखच अनेक अंधश्रद्धा आपल्याला आपल्या मोबाईल फोन/भ्रमणध्वनी बाबत आहेत. अशाच काही अंधश्रद्धाबद्दल आज थोडी उहापोह करणार आहे.

मोबाईल फोन सर्वात मोठी अंधश्रद्धा आजकाल अशी आहे की, रात्रभर फोन चार्जिंगला लावला तर त्याची बॅटरी खराब होते. आता ज्याला आपण स्मार्टफोन म्हणतो त्याला चार्जिंग पूर्ण झाल्यावर काढा अथवा त्याआधी. त्याने काहीही फरक पडत नाही.

पूर्ण चार्जिंग झाल्यावर तो आपोआप बॅटरीसोबत असलेली विजेचा प्रवाह खंडित करतो. त्यामुळे बॅटरीला काहीही इजा पोहचत नाही. त्यामुळे चार्जिंग करतांना किंवा पूर्ण झाल्यावर प्रवाह चालू राहिला तरी अथवा वीज गेल्यावर स्मार्टफोनला फारसा फरक पडत नाही.

काही जणांना असेही वाटते की इलेट्रीक बोर्डवर फार काळ फोन चार्जर लावून ठेऊ नये. ही देखील अंधश्रद्धा आहे. आता जर घरातील विजेच्या तारांमध्ये बिघाड झाला तरच फरक पडू शकतो. किंवा लहान मुलांनी ओढाताण केली तरच. अन्यथा इलेट्रीक बोर्डवर जाऊन ठेवल्याने फारसा फरक पडत नाही.

अजून एक अंधश्रद्धा प्रचलित आहे की स्मार्टफोन अपूर्ण चार्जिंग केल्याने त्याला वा त्याच्या बॅटरीला कमी चार्जींगवर वापराची सवय लागते. आता एक गोष्ट स्पष्ट सांगतो. बॅटरी हा सजीव अथवा मेंदू असलेली वस्तू नाही. त्यामुळे त्याला सवयी वगैरे गोष्टी लागू शकत नाही. किमान ४०% ते ८०% चार्जिंगवर फोन व्यवस्थित चालू शकतो.

लक्षात घ्या स्मार्टफोन हा केवळ यंत्र आहे.

मोबाईल फोन आजकाल दैनंदिन गरज झाली आहे. संपर्कासोबत माहिती मिळवण्याचे साधन बनले. जगाशी संपर्कात राहता येते. त्यामुळे त्याची तब्येत चांगली राहावी म्हणून अनेक कल्पना प्रत्येकजण वापरतो. एकूण चोवीस तासात काही क्षणांची विश्रांती आवश्यक आहे. सतत चालू राहिल्याने त्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे काही काळासाठी तो बंद ठेवणे अत्यंत किफायतीशीर ठरते.

अजून एक अंधश्रद्धा चार्जिंग करतांना त्याचा वापर करू नये. फोनवर बोलतांना त्याचा स्फोटच्या काही घटना घडलेल्या परंतु इतर गोष्टी करण्यास काही हरकत नाही. जेंव्हा तुम्ही फोन वापरत नाही. त्याहीवेळी स्मार्टफोनच्या बॅकग्राऊंड/अंतरंगात चालूच असतात. त्यामुळे तुम्ही एखादी नवीन केलेली गोष्ट फारसी बदल घडवणारी नसते.

एक शेवटची अंधश्रद्धा! मोबाईल फोन लॅपटॉपला जोडून ठेवल्याने लॅपटॉप किंवा त्याची बॅटरी बिघडते. लॅपटॉप सातत्याने फार काळ वापरल्यामुळे किंवा बॅटरी प्रमाणापेक्षा अधिक गरम झाल्याने ती खराब होते. यात मोबाईलचा काहीएक संबंध नाही. काही शंका असल्यास निःसंकोचपणे कळवा.


2 प्रतिसाद ते “स्मार्टफोन चार्जिंगमधील अंधश्रद्धा”

  1. भ्रमणध्वनीच्या आश्चर्यकारक अंधश्रद्धा…
    वाचल्यानंतर लक्षात आलं की या गोष्टी करताना आपणही काही अंशी याच्या चक्रात आहोत.😂

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.