स्वभाव


स्वभाव ही खुपंच मजेदार गोष्ट आहे. तो प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. म्हणजे नेमक काय हे सांगता येणार नाही.आपले वागणे

स्वतःचे निरीक्षण करून पहा. मी जसा घरी असतांना वागतो. तसा बाहेर किंवा इतर ठिकाणी वागत नाही. सर्वांचेच जवळपास असेच असते.

माझा एक मित्र आहे. त्याला राग आल्यावर तो समोरच्या व्यक्तीला मनाला टोचेल असे बोलतो. आता त्याच्या घरी देखील तो तसाच आणि बाहेरही तसाच.

काल मैत्रिणीला दिलेला पेन ड्राईव्ह आणायला गेलो होतो. निघतांना काकूंना, फराळाला या अस म्हटलं. लगेच माझी मैत्रीण ‘फक्त काकूच का?’ अस म्हणाली. मैत्रिणी बद्दल काय बोलावं? प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेते.

माझा स्वभावाबद्दल थोडक्यात बोलायचे झाले तर, ‘जशास डबल तसे’ असा आहे. आता नेमक कसं सांगू? माझा पीएम यावर नीट बोलू शकेल.

अप्सरा खुपंच रागीट आहे. राग नाकावर असतो. प्रत्येक जण जितका प्रेमळ तितकाच रागीट असतो. जितका चांगला तितकाच वाईट देखील.

आपण आपल्यातील वाईट रूप लपवून ठेवतो. आईचा स्वभावात सडेतोडपणा! जे आहे ते तोंडावर सांगणे. माझे वडील काही बोलत नाही. आपल्या कृतीतून दाखवतात. त्यामुळे प्रत्येकाचा स्वभावाच विशेष आहे.

स्वभाव बदलणे खुपंच अवघड आहे. थोडक्यात आपण स्वतःला नवीन रूप दिल्याप्रमाणे असते. गांधीजींनी गोळी खाल्ल्यावर ‘हे राम’ म्हटले. कदाचित राहुल बाबा ‘हे मॉम’ म्हणेल.

जसे आपण असतो तसे दिसतो. काही व्यक्ती पाहिल्यावर आपल्याला नकोसे वाटते. तर काही ‘लव्ह एट फस्ट साईट’.

प्रत्येकाच्या स्वभावावर ते अवलंबून असते. स्वभावसारखे असतील तर मैत्री होते. काहींचा स्वभावच मनमिळावू असतो. त्यांचा मित्रपरिवार बनतो. काहीजण एकलकोंडे.

शेवटी सगळंच स्वभावावर अवलंबून असते. म्हणजे जर बुशचा स्वभाव आपल्या मनमोहनसिंग सारखा असता तर.. अमेरिकेत अजून दहावीस इमारतीवर विमाने येऊन धडकली असती.

वातावरण आणि परिस्थिती यावर स्वभाव बनतो. काहींना घराचा सहवास कमी मिळाला तर त्यांना ‘घराबद्दल ओढ’ निर्माण होते. काहींचे अगदी उलटे.

थोडक्यात, मला फक्त अस म्हणायचे आहे की स्वभाव आपल्याला सुधारू अथवा बिघडून टाकू शकते.

,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.