स्वराज्य


राजे वैतागले. ‘चाकरी’ किती दिवस? किती दिवस अजून दुसऱ्याचे राज्य टिकवण्यासाठी/वाढवण्यासाठी लढाया मारायच्या. आणि लढाया मारून देखील मरायचे. कधी कामाने, तर कधी ‘अपमानाने’. स्वत्व, स्वाभिमान प्रत्येकदा चिडतो. शेवटी काय मिळते. बस, दोन वेळच्या भाकरीसाठी. आणि किती दिवस ही मोगलाई सहन करायची? प्रत्येक ठिकाणी तेच. प्रत्येक सैनिकाची इच्छा, मी सरदार कसा होईल! आणि सरदार झाल्यावर वतनदार आणि मग जहागीरदार. मला माझ्या राज्याचा राजा व्हायचे आहे. स्वतःसाठी स्वतःच्या बळावर राज्य उभे करायचे आहे. कितीही केले आणि कसेही केले दुसऱ्याकडे चाकरी मनाला पटेल अस काही विचार करण्याचीही मुभा मिळत नाही. बस एक आदेश मिळतो. लढाई सुरु. दुसऱ्याचे राज्य मोठे करून कसला शौर्यपणा. कसली बहादुरी? असो, त्याचाच श्रीगणेशा करण्याचा मानस आहे. त्यासाठी ही तयारी. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.