स्वातंत्र्य आणि वीर सावरकर


आज संध्याकाळी सह्याद्री वाहिनीवर ‘वीर सावरकर’ हा चित्रपट पहिला. वा! खरच खुप छान चित्रपट. असे चित्रपट दाखवले तर का कोण लोक नाव ठेवतील सह्याद्रिला. असो, सावरकरना स्वातंत्र्यवीर असे का म्हणतात ते आज कळले. खरच खुप त्रास सहन केला त्यानी. त्यानी केलेली हिंदू या शब्दाची व्याख्या अगदी योग्य आहे. आपण उगाचच अहिंसा आणि सर्वधर्म समभावाचे गोडवे गातो. आता कालचा घ्या ना. काल १४ अगस्त, पूणेस्टेशन मधे एक पीर आहे. कोण संत आहे ते काही माहिती नाही. परंतु आहे. काल मी बघितले की पिराच्या बाजूला एक मोठा मंडप टाकला होता. आणि काही तरी न समजेल अशी गाणी लागलेली होती. बर त्यात काही मला चुकीच वाटल नाही. परंतु तिथे एक हिरवा रंग असलेला आणि त्यावर चांदनी अशा झेंडा फडकत होता. चोकोन एवजी आयताकृति केला तर पाक चा शोभेल असा.

जाऊ द्या लोकशाही आहे. आणि आज सकाळी आमच्या गणपती मंदिर समोर झेंडा वंदन झाले. दोनीही गोष्टीत समानता फरक फक्त विश्वासाचा. आमचा विश्वास तिरंग्याचा आणि त्यांचा, न बोललेले बरे. नाही तर तुम्ही मला जातीयवादी म्हणाल. आणि उगाचच भलता सलता विचार कराल. पुण्यात शाळ, कॉलेज ना सुट्या असल्याने झेंडा वंदन अनेक ठिकाणी झाले नाही. पाहून्या स्वाइन फ्लूची कृपा. तुकड़याचे स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. अशा मताचा मी आहे. जाऊ द्या. आपण इतिहास आणि भूगोलाचा विचार न केला तर बर. नाही तर मग आपणच बैचैन होवून जातो. वीर सावरकर हे खरच वीर आहेत. त्याना दोन जन्मठेप झाल्या. वा जगातील एकमेव क्रांतिकारी की ज्याला ५० वर्षांची शिक्षा झाली. त्यानी केलेली कामे अजरामर आहे. आजकालच्या नेत्याना सावरकर कोण होते, आणि त्यानी काय केल याचा अभ्यास करायला हवा. त्यांची स्वातंत्र्याची कल्पना ‘शायनिंग इंडिया’ आणि ‘आम आदमी’ नव्हती. त्यांचे धोरण मला पटते. प्रत्येकाला सैनिकी शिक्षण. विचार करा जर हे झाल असत. तर कसाब आणि त्याचे साथीदार इथ आल्यावर १० मिनिट देखील जिवंत राहू शकले नसते. देश आणि देशाच रक्षण हे महत्वाचे विषय, सोडून कोणताही विकास काय कामाचा? जर अमेरिकन सैन्य बलवान नसत तर त्याच्या वैभवाला कोणी देखील संपवल असत.

माझ्या मते तरी वीर सावरकर आणि त्यांचे स्वातंत्र्य विषयीचे विचार, अंगी कारायाला हवे. सुभाषचंद्र बोसाना युद्धाची प्रेरणा, हिंदू मधील जात व्यवस्था मोड़न्याची कल्पना, हिंदू युवाकाना सैन्यात जाण्याची आवाहन. आणि देश प्रेम ह्या गोष्टीनी मी तर त्यांचा फैन झालो आहे. देश कसा असावा आणि त्यासाठी काय आवश्यक आहे ह्याजी परिपूर्ण जाणीव आहे असा नेता. नाही तर आमचे आज कालचे नेते. झाडू घेवून फोटो काढतात. म्हणे पूणे स्वछ करणार. मग आता पर्यंत काय झोप काढ़त होतात? बर झाडू कैमरा बंद झाल्यावर फेकून दिला. आता काय सांगाव, नुसत्या २०२० च्या गप्पा मारायला सांगा. आता काय तर काही नाही जे काही ते २०२० मधे. म्हणे आपण महासत्ता होणार. सत्ता पाहिजे याना फक्त. महा ची काय गरज नाही. आणि करून तरी काय फायदा याना?


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.