स्वार्थी


काही खर नसत. आज जे आहे आणि जस वाटत ते कधी बदलेल याचा नेम नाही. नवीन कंपनीचे काम आणि येथील लोक फारच वेगळे आहेत. त्यांना ‘ब्लेमगेम’ मधेच आनंद असतो. पण एका अर्थाने ते बर आहे. निदान आशा अपेक्षा वाटत नाहीत. काही या कंपनीत जॉईन होऊन अजून महिना झाला नाही. माझ्या जुन्या कंपनीतील माझे मित्र मैत्रीण असे वागत आहेत की जणू काही मी कंपनी सोडून काही शतक उलटली आहेत.

एकालाही माझ्याशी बोलण्यात रस नसतो. कायम टाळतात. बर कालच माझ्या जुन्या कंपनीतील मित्राला रात्री फोन केला होता. साहेबांनी फोन बंद करून ठेवला. आणि आज म्हणाला की माझा फोन मधेच बंद होत असतो. माझ्या जुन्या मैत्रिणी बद्दल काय बोलू?. तीला कधी काम सोडून माझ्याशी बोलाव अस वाटत नाही. थोड्या वेळा पूर्वी फोन केला. आणि म्हणाली मला सोफ्टवेअर हवे आहे. बाकीचे देखील तसेच. सगळे स्वार्थी आहेत. ज्यांच्या सोबत मी दीड वर्ष होतो. ते असे माझ्याशी वागतील अस स्वप्नात देखील आल नव्हत. बर ज्या परप्रांतीयांना मी नाव ठेवली. कंपनी सोडतो म्हटल्यावर ज्यांना आनंद झाला होता. ते अधून मधून माझ्याशी बोलत असतात. काय म्हणाव आता. असो आई वडिलांनी माझ्या ‘लग्नाची’ मोहीम आता जोरात सुरु केली आहे. सोडा आज माझा मुडच नाही आहे. नंतर बोलू.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.