हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही


हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा नाही. धक्का बसला ना. राज्यघटनेतील कलम ३४३ चे चुकीच्या अर्थाने देशभरात हा गैरसमज पसरलेला आहे. हो, हे खरे आहे. मी देखील शालेय जीवनात हिंदी राष्ट्रभाषा आहे असेच शिकलो. परंतु ते धादांत खोटे आहे. सुरवातीला मलाही धक्काच बसलेला.

ही खोटी माहिती आपल्याला सुरवातीलाच ही माहिती सांगितल्याने जवळपास प्रत्येकजण हिंदी भाषा शिकण्यास तयार होतो. आपल्या प्रमाणे देशातील अनेक राज्यात हाच समज अगदी स्वातंत्र्यापासून पसरवला गेला आहे.

राज्यघटेनच्या ३४३ कलम असे सांगते की कार्यालयीन वापरासाठी हिंदी व इंग्रजी ह्या दोन भाषा वापरल्या जातील. राष्ट्रभाषा अथवा नॅशनल लॅंग्वेज (National Language) असा साधा उल्लेख देखील राज्यघटनेत नाही.

 

मग राष्ट्रभाषा असा गैरसमज का पसरविला जातो? तर याच उत्तर असे आहे कधीकाळी देशाची राष्ट्रभाषा व्हावी असे हिंदी पट्ट्यातील नेत्यांनी काँग्रेसच्या कार्यकारिणीत भला मोठा गहजब केला. अहिंदी राज्यांच्या नेत्यांनी विरोध झाल्यावर मतदानाने हा निर्णय घेण्याचे ठरले. व एका मताने ती राष्ट्रभाषा होऊ शकली नाही.

याच गोष्टींचा आकस मनात ठेऊन पुढे राज्यघटनेत ३५१ कलम टाकून हिंदीचा प्रचार केंद्राने करावा असा आदेश दिला गेला. भाषिक असमानता कमी करण्यासाठी साली १९५० मध्ये आठव्या अनुसूचीमध्ये, आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, कश्मीरी, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलगू आणि उर्दू – १९५० पासून ते सिंधी , कोंकणी, मणिपुरी आणि नेपाळी समाविष्ट करण्यासाठी द्वितीय वेळ होती.

हिंदीचा दुराग्रह इतका वाढला गेला की, देशाच्या भाषिक आयोगाच्या आकडेवारीनुसार स्वातंत्र्यपूर्व आठशेपेक्षा अधिक भाषिक असलेला भारत आज त्यातील अडीचशेपेक्षा अधिक भाषा गमावून बसला आहे. पुढील पन्नास वर्षात अजून चारशे भाषा नष्ट होण्याची नामुष्की येण्याची भीती देखील व्यक्त केली आहे.

बिहारी लोकांना आपण हिंदी भाषिक म्हणतो. परंतु हजार वर्षे जुनी मैथिली ही त्यांची मातृभाषा हिंदी दुराग्रहाने नष्ट केली. हिंदी पट्ट्यातील अनेक भाषांना हिंदीने आधीच चिरडले आहे. सध्याला देशाची लोकसंख्या १३० कोटींच्या घरात आहेत. यातील केवळ ५२ कोटी लोकांना हिंदी समजते.

हिंदीचा त्वेषाने उधळलेला वारू रोखण्याचे खरे काम कोणी केले असेल तर तामिळी वाघांनी. स्वातंत्र्यानंतर ब्रिटिश गेले आणि हिंदी राज्यकर्ते अगदी भाषिक राज्य आणू लागले. त्यावेळी तामिळनाडू राज्यात संघर्ष हिंसक झाला. देशाचे पुन्हा तुकडे होऊ नये या भीतीने मद्रास करार केला गेला. व हिंदीला कधीही राष्ट्रभाषा करणार नाही या अटीवर विषय संपवण्यात आला.

बांगलादेश पाकिस्तानपासून विलग होण्याच्या कारणात उर्दूसक्ती हेही एक प्रमुख कारण आहे. मुळात बहुभाषिक भारतात कोणती एक भाषा राष्ट्रभाषा करणे हे संघराज्याच्या तत्वांना तिलांजली देण्यासारखे आहे. देशाचा आकार पाहता खंडप्राय का म्हणतात याचा अंदाज येईल!

जगातील एकूण ६००० भाषांपैकी सर्वाधिक आठशे भाषा बोलणारा देश म्हणून भारत ओळखला जातो. आपले वैशिष्टय आपण गमावत आहोत.

हिंदीला राष्ट्रभाषा करणे वा अपसमज पसरवणे देशाच्या मुळावर व भाषिक स्वातंत्र्यासोबत राज्यघटनेच्या तत्वांना तिलांजली देण्याप्रमाणे आहे. संघराज्याच्या अर्थच हा आहे की सर्वांनी स्वयंसंमतीने हा देश उभा केला आहे. कोण्या एका भाषेचा दुराग्रह देशविघातक आहे.

शब्दांची मर्यादा पाळण्यासाठी सर्वच संदर्भ खाली जोडत आहेत.
१) भारतीय सांख्यिकी अहवाल (२०११ जनगणना) – http://censusindia.gov.in/2011Census/C-16_25062018_NEW.pdf
२) भाषिक वाताहत लेख – https://www.thehansindia.com/posts/index/News-Analysis/2016-07-28/India-rapidly-losing-its-languages/245117
३) भारताला राष्ट्रभाषा का नाही माहिती – https://timesofindia.indiatimes.com/india/Learning-with-the-Times-India-doesnt-have-any-national-language/articleshow/5234047.cms
४) भारतीय भाषा संपण्याची भीतीवरील लेख – https://www.indiatimes.com/news/india/india-lost-250-spoken-languages-in-the-last-50-years-will-lose-400-more-in-the-coming-decades-327187.html
५) तामिळींचा हिंदीचा विरोध – https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8B%E0%A4%AD

,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.