हिंदी राष्ट्रभाषा नाही


आता आत्तापर्यंत मी देखील हे मानत आलो होतो. पण आज डॉ. वि. भि. कोलते यांचा आजच्या ‘सामना’ मध्ये आलेला लेख वाचला. आता मी काही कायदे पंडित नाही. किंवा मी हिंदी भाषेचा विरोधक वगैरे नाही. मी हिंदी गाणी ऐकतो. हिंदी चित्रपट पाहतो. हिंदी चित्रपटातील नट आणि नट्या देखील आवडतात. याआधी मी सलील कुळकर्णी यांचे देखील लेख वाचले आहेत. ‘अमृतमंथन‘ हा ब्लॉग तर मी नेहमीच वाचतो. खूपच अभ्यासपूर्ण लेख असतात. कधी वेळ मिळाला तर नक्की वाचा. हिंदी भाषा ह्या बद्दल आपल्या देशाच्या संविधानात ‘राष्ट्रभाषा’ नव्हे तर कार्यालयीन भाषा म्हणून स्वीकारली आहे. आता संविधान देखील इंग्लिश मध्ये लिहिले आहे. आणि त्यात १७ वा भाग आणि अनुच्छेद ३४३ व ३५१ मध्ये ‘The Official Language of the Union shall be Hindi in Deonagari Script.’ म्हणजे ‘संघराज्याची राजभाषा देवनागरी लिपीतील हिंदी असेल’ अस स्पष्टपणे लिहील आहे. राजभाषा आणि राष्ट्रभाषा हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. आणि अर्थही वेगवेगळा.

मला हिंदी भाषेविषयी अनादर नाही. परप्रांतीय लोकांविरुद्ध आहे. आणि त्याची कारण त्यांनीच निर्माण केलेली आहेत. आज तो विषय नको. उगाचच माझा दोस्त मला नवीन नवीन नामकरण विधी करेल. तसं मला त्याचा आणि त्याचे मुद्दे या दोघांबद्दल काहीच वाटत नाही. कारण कोणीही मराठी असाच विचार करत असतो. मी देखील आधी असाच विचार करत होतो. सोडा तो विषय. डॉ. वि. भि. कोलते हे नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांनी ज्या अर्थाने आणि ज्या अभ्यासाने हे मांडलं आहे त्यावरून विश्वास न ठेवण्या इतपत मी मूर्ख नाही. हिंदी हि एक चांगली भाषा आहे. ती राजभाषा असून देखील आमचे पंतप्रधानच काय पण आमचे भूतपूर्व राष्ट्रपती त्यात भाषण ठोकत नाहीत. मध्यंतरी विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी आपले केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम साहेब पुण्यात आले होते. त्यांनीही भाषण इंग्लिशमध्ये केले. नाही तरी हिंदी भाषिक लोकांचे इंग्लिश प्रेम सर्वश्रुत आहेच.

जाऊ द्या तात्पर्य हिंदी एक संपर्क भाषा आहे. राष्ट्राने ती भाषा आपल्या दैनंदिन कामकाज करण्यासाठी म्हणून स्वीकारली आहे. पण आमचे सगळे प्रशासकीय कागदपत्र इंग्लिशमध्ये का असतात कुणास ठाऊक. एवढंच काय पण मुंबईत ज्या राजीव गांधी की स्वातंत्रवीर सावरकर असा वाद घडला तो पूल देखील ‘सी लिंक’ अस नामकरण केल गेल. अस का ते अजूनही समजत नाही. त्यालाच जर ‘समुद्र सेतू’ एवढ सोप साध नाव का नाही कुणास ठाऊक. माझा सिनिअर पश्चीम बंगालला ‘वेष्ट बेंगॉल’ अस म्हणतो. कोलकात्याला क्यालाकाटा अस म्हणतो. अस का तेच काळात नाही.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.