हॅक


यार, माझ फेसबुकचे खाते आज पहाटे कोणीतरी हॅक केलेल. खर तर त्या ३१ डिसेंबरला मी माझे चिरकुटचे आणि हे फेसबुकचे खाते बंद केलेले. पण आज पहाटे तीन साडेतीनला कोणीतरी पुन्हा री-एक्टिवेट केलेल. कंपनीत येऊन पाहतो तर, फेसबुकचा ‘वेलकम बॅक’चा इमेल आलेला. यार, कोणत्या महान व्यक्तीने हे कृत्य केले कुणास ठाऊक. परंतु, त्यामुळे पुन्हा त्या फेसबुकवर यावे लागले. असो, हे म्हणजे असे झाले की, चोराच्या घरात चोरी.

आता हॅक करणे ही फार मोठी गोष्ट नाही. मी देखील माझ्या मित्रांची खाती अनेकदा उघडलेली. पण ते सगळ संगणकाचा कोर्स करीत असतांना. त्यानंतर, अस जास्त वेळा नाही केल. त्यावेळी मला मजा वाटायची. माझी नेहमी एखादा व्हायरस बनवावा अशी इच्छा. पण अजूनपर्यंत, काय पूर्ण झाली नाही. पण करेल. सॉफ्टवेअर क्रॅक ही तसेच. आता त्या भानगडीत अनेकदा माझ्या पीसीवर अनेक अनोळखी पाहुणे उर्फ व्हायरस आलेले. संगणकाचा कोर्स करीत असतांना एक छोटे सॉफ्टवेअर बनवलेलं. व्हीबी त्यावेळी फॉर्ममध्ये होते. पंचांगमध्ये गुणमेलन कोष्टक असते ना ते बनवलेलं. मुलाच्या आणि मुलीचे नावाचे आद्याक्षर टाकायचे. आणि किती गुण जुळतात ते सॉफ्टवेअर दाखवायचे. असो, माझा फेसबुकच्या खात्याचा पासवर्ड खुपच साधा होता. त्यामुळे, कदाचित हॅक करणे सोपे झाले असावे. आता पासवर्ड बदलला आहे.

तस् मी आता फेसबुक वापरेल अस नाही. मुळात मला नाही आवडत. सगळेच भुकेलेले. फ्रेंड कधी ‘रिक्वेस्ट’ करून होतो काय? मुळात मित्र ही संकल्पना बदलून गेलेली आहे. दोन चारदा बोलले किंवा भेटले की झाला मित्र असा समज झाला आहे. मला त्या ‘खरा मित्र कोण?’च्या वादात पडायचे नाही. गेल्या काही दिवसांपासून माझा संगणक गंडला होता. आणि काम देखील इतके आहे ना. त्यामुळे ‘मेलामेली’ करणे देखील जमत नाही. काल दोन ‘शिप’ झाल्यात. काल दुपारी दोन वाजता कंपनीत आलेलो. पहाटे पाच वाजता घरी गेलो. आज ना झोप झाली आहे. आणि ना देवपूजा. तरीही काम काही आवाक्यात येईना. त्यात माझा पीएम आणि बॉस म्हणजे उत्तर आणि दक्षिण ध्रुव. ते लहान मुल जस् असतात ना. तस्! ह्यांचे हट्ट. सोडा, आज पुन्हा बरेच चेंजेस सांगितले आहेत. बऱ्याच गोष्टी घडल्या आहे. खूप काही बोलायचं आहे. पण वेळ! तोच तर नाही. असो, बाकी बोलूच.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.