जीमेल आयडी कसा तयार करावा?


जीमेल ही जगातील सर्वात मोठी इमेल सेवा आहे. व्हॅट्सऍप आणि स्कायपी/फेसबुक मेसेंजरच्या युगात ह्याबद्दल फारसे बोलावे असे नाही. परंतु आजही व्यावसायिक पातळीवर इमेलला महत्व आहे. १.४ अब्ज लोक जीमेलचा वापर करतात. १ एप्रिल २०१४ (चौदा वर्षांपूर्वी) साली याची सुरवात झाली. 

एका सर्वेक्षणानुसार अमेरिकेतील ६०% मध्यम उद्योग व ९२% छोटे नव्याने सुरु झालेले उद्योग (स्टार्टअप) या सेवेचा उपयोग करतात. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. वाढत्या स्पर्धेला पाहता गुगल कंपनीने १५ जीबी गुगल ड्राइव्ह सेवेसोबत याला जोडले आहे. त्यापैकी साधारण ४ जीबी जीमेलसाठी मिळतात. सोबत इमेल स्कॅन सारख्या वैशिष्ट्य दिलेले आहे.

ब्राउझरमध्ये जीमेलचा पत्ता टाका (gmail.com)

उघडलेल्या पानावर नवीन खाते बनवण्यासाठी खाते तयार करा (Create account) ह्या दुव्यावर क्लिक करा

नाव, आडनाव आणि इच्छित युझरनेमची निवड करा. जर आधी कुणी घेतले असल्यास युझरनेममध्ये बदल करून पहा. लक्षात राहील असा पासवर्ड टाका व तोच पुन्हा कन्फर्म पासवर्डचा रकान्यात टाका. जर सर्व व्यवस्थित असेल तर पुढे जा म्हणजेच नेक्स्ट (NEXT) या बटनावर क्लिक केल्यावर पुढील पान उघडेल. अथवा जिथे बदल आवश्यक असेल तिथे लाल रंगाचा रेष दिसेल.

या पानावर आपल्याला मोबाईल क्रमांक व वापरात असलेला इमेल आयडी टाकावा लागेल. दोन्हीही गोष्टी ऐच्छिक आहेत. परंतु जन्माची दिनांक व लिंग आवश्यक बाब आहे.

 

गुगलच्या सेवा अटी मान्य केल्याखेरीज खाते तयार केले जाऊ शकत नाही. आय एग्री (I AGREE) बटनावर क्लिक केल्यावर ईमेल तयार होईल.

 

जीमेल सेवेचा अग्रभाग अतिशय सुंदर व तितकाच उपयोगी आहे. सोबत गुगल हँगआउट, गुगल केलेंडर, गुगल टास्क अशा विविध सेवा देखील आपल्याला मिळतील. 

जीमेलचे मोबाईलसाठी अँप/अनुप्रयोग (दुवा: अँड्रॉइड ओएस) देखील आहे. आपण तोही वापरू शकता. काही शंका असल्यास आपण खाली दिलेल्या प्रतिक्रिया रकान्यात आपले प्रश्न विचारू शकता.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.