हेल्मेट


गेले आठवडाभर उन्हात भाजून भाजून माझा चेहरा कोळशाप्रमाणे झालाय. शेवटी नाही हो करीत आज एक हेल्मेट खरेदी केले. फारच महाग आहेत. पण चला ठीक आहे. घातल्यावर मला ‘डोक् आहे’ याची जाणीव झाली. ते हेल्मेट राखाडी रंगाचे आहे. आज मी त्याच रंगाचा शर्ट घातलेला आहे. खर तर सगळच मॅचिंग मॅचिंग झाल आहे. हेल्मेट राखाडी, शर्ट राखाडी. मी माझे केस, पॅंट आणि बूट काळे.

तस् हेल्मेट पूर्ण आहे. सुरवातीला वाटलेलं की, हेल्मेट घालून बाईक चालवतांना अडचणी येतील. म्हणजे खर तर याआधी कधीच मी हेल्मेटसह बाईक नाही चालवलेली. थोडी धाकधूक होती. पण काय अडचण नाही. फक्त एवढ आहे की, मी जेव्हा सुरवातीला हेल्मेट घातल्यावर शरीरापेक्षा डोक्याचे वजन जास्त वाटत होते. पण एक चांगल की, त्याच्या काचेमुळे डोळ्यात धूळ वगैरे जाणार नाही. तस् काच लावल्यावर देखील हवा येते. परंतु चौकात सिग्नलल थांबल्यावर जाम गुदमरले. अस दोन तीनदा घडलेलं. आज कंपनीत येतांना सिग्नलच सिग्नल. तो हिरवा दिवा काय भेटलाच नाही. बर गाडी गिअरमध्ये त्यामुळे क्लच आणि ब्रेक दोन्हीही सोडता येत नव्हते. बर, पुण्यात आल की, खुपच कमी ठिकाणी ते सिंगालच्या वेळेचे ‘काऊन डाऊन’ असते.

असो, शेवटी वैतागून एका ठिकाणी गाडी बंद करून ती काच जरा वर केली. ह्या हेल्मेटला सन गॉगल देखील आहे. एकूणच ठीकठाक आहे. आज गाडीला नंबर टाकून घेतला. आणि तो ही मराठीत. मला तो नंबर टाकून देणारा सांगत होता की, आरटीओवाल्यांना इंग्लिशमध्ये नंबर हवा असतो. तसा नियम आहे म्हणे. त्याला म्हटलं तू मराठीत नंबर टाक. मी घेतो पाहून पुढच! राज्य मराठी, लोक मराठी. मग ह्यांचे नियम इंग्लिश का हे काय कळत नाही. मला कोणी आरटीओ वाल्याने पकडावे. मग सांगतो, कायदा म्हणजे काय निसर्गाचा नियम नाही. आजकाल व्यायाम व्यवस्थित होत नाही आहे. आणि जेवण देखील व्यवस्थित होत नाही आहे. कदाचित त्यामुळे मी असा चिडचिडा होतो आहे की काय याची शंका येते आहे. बाकी हेल्मेट मस्त आहे. आतून मऊ मऊ आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.