हे मित्र ना..


हे मित्र ना, काय करतील देव जाणे. आज दुपारी कॅन्टीनमध्ये चक्क ती ज्या रो मध्ये बसलेली तिथे जागा पकडली. हुश्श! हालत खराब झाली होती. आज सकाळी मला ती उदास वाटत होती. म्हणजे, तिचा चेहरा. मी माझ्या मित्राच्या डेस्कजवळ उभा असतांना ती तिच्या मैत्रिणीसोबत पाणी आणायला चाललेली. त्यावेळी तीला मी पहिले. पण.. सोडा. आज दुपारी, जेवायला जातांना पुन्हा मित्रांचे नखरे. तरीही हो नाही करीत आले नवीन कॅन्टीनला. पण मी कॅन्टीनमध्ये गेलेलों, तेव्हा ती नव्हती. मग विचार आला, ती जुन्याच कॅन्टीनमध्ये असेल तर. मित्रांना म्हटलं आता आपण जुन्या कॅन्टीनला जावू. अस म्हटल्यावर सगळेच चिडले.

आम्ही तिथून निघालो. आणि नवीन कॅन्टीनच्या गेटमध्ये आलो तर ‘अप्सरा’ कॅन्टीनमध्ये येत होती. बहुतेक तिचे मित्र मैत्रीण देखील होते सोबत. यार, तिला पाहिलं की.. नाही नको, पुन्हा. सोडा, मग केली हिम्मत आणि ‘हाय’ केल. थोड पुढे गेल्यावर, पुन्हा त्या मित्रांना ‘चला, इथेच जेवूयात’ म्हटल्यावर मात्र ते जाम वैतागले. पण आले. एका मित्राला जागा शोध म्हटलं. आणि मी कुपनसाठी रांगेत जावून कुपन घेतली. मी जेवणाचे ताट घेऊन पाहतो तर, हे सगळे ती आणि तिचा ग्रुप जिथे बसलेला त्याच्या बाजूलाच. यार, पाहून खरच घाम फुटलेला. दोन खुर्च्या सोडून तिच्या समोरच्या बाजूला मी. यार, ती समोर असली की, अस होत. आज ती किती छान दिसते आहे. जेवतांना मान वर करण्याची हिम्मतच होईना.

तिच्या बाजूला बसलेला तिचा एका मित्राशी माझी ओळख आहे. म्हणजे मला माहिती आहे की, तो तिचा मित्र आहे. तिने त्याला ‘आमच्या दोघांचा चेहरा एकसारखा आहे’ अस सांगितले. कसला आहे, मला येऊन सांगितले त्याने हे. असो, गोल चेहरा, बारीक आणि चापून चोपून ठेवलेले केस. मोठे कल्ले, आणि मिश्या. आणि तब्येतीने साधारण. सेम दोघांचे. गावाकडील सगळेच अस ठेवतात. तो देखील गावाकडचा. त्यामुळे ती म्हटली. मग तिने मला पाहिलेलं हे लक्षात आल. मग काही नाही, तिच्याकडे पहिले आणि हाय केले. किती गोड हसते ती. हसतांना तिचा तो चेहरा, किती छान.

असो, मग सगळ खूप छान. आज मी दुप्पट जेवण केल. म्हणजे रोज पाच पोळ्या खात असतो. खर तर त्या पोळ्या एका घासाच्या. तिच्यासमोर खूप बारीक बारीक करून खात होतो. उगाच मला राक्षस म्हणायची. पण काय करणार, कॅन्टीनमध्ये ते कितीही खाल्लं तरी पोटाच भरत नाही. खर तर, मित्रांच्या खूप चेष्टा मस्करी चाललेली. पण ती जवळ असल्यावर, माझ सगळ लक्ष तिच्याकडेच होते. तिच्याकडे पाहण्याची आज हिम्मत केली आणि कॅन्टीनमध्ये. अगदी खर सांगू का?

ती इतकी छान आहे ना! की तिची आणि माझे पहिले लंच/डिनर किंवा साधी कॉफी व्हावी अशी इच्छा आहे. पण कॅन्टीनमध्ये, किंवा मेसमध्ये किंवा फडतूस हॉटेलमध्ये व्हावे अशी माझी मुळीच इच्छा नाही. अस एखाद्या छानशा हॉटेलात व्हावं, जिथे तिला आवडेल. आणि अन्न देखील चवदार असेल. म्हणून खर तर मी कॅन्टीनमध्ये तिला पाहून न पाहिल्याप्रमाणे करतो. म्हणजे भीती वाटते हे सुद्धा खर आहे. असो, कधी तो दिवस येईल देव जाणे! पण तो दिवस नक्की येवो. जेव्हा ती आणि मी फक्त. सोडा, आजचा दिवस खूप चांगल आहे. आणि ती देखील खूप छान. आज मित्राच्या मदतीमुळे दिवस खूप छान झाला. मित्र पण ना, खूप चांगले मिळाले आहेत मला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.