१००


आज फ्लूने शतक केल पुण्यात. आता सचिनने देखील केल म्हणा. कदाचित शंभर म्हटलं की क्रिकेटच आठवेल. पण पुण्यात सावळा गोंधळ चालू आहे. आता मी काही त्या हिंदी बातम्यांच्या वाहिन्यांचा प्रतिनिधी नाही, की ‘फ्लू का आतंक’ म्हणायला. पण सुरवात आणि शतक पुण्यातच घडल. मुळात त्या स्वाइन फ्लू बद्दल काय बोलाव तेच कळत नाही. ना त्यावर योग्य उपाय ना लोकात जागरुकता. प्रत्येक जण तोंडाला रुमाल बांधून फिरतो. पण रुमाल बांधल्याने फ्लू होणारच नाही अस नाही. सरकारला तर काही बोलून फायदाच नाही. पालिका फ़क़्त आम्ही हे केल आणि ते केल्याच्या गप्पा. निष्पन्न काहीच नाही. लोक आपली मरतच आहे. बर गेलेल्यांपैकी काही कधीही घराबाहेर न पडलेल्या आहेत.

दोन दिवसापासून आमच्या कंपनीत जवळपास सगळ्यांनाच सर्दी झाली आहे. पण फार काही चिंतेच कारण नाही. मला देखील झाली आहे. पण एका दिवसात जाईल याची मला खात्री आहे. स्वत:ची स्वत: काळजी लोकांनी घेतली तर फ्लू कमी होईल. आमचे पुणेकर का त्या सरकारला देव मानते कुणास ठाऊक. बर अंगात ना काही दम आणि नुसत मास्क घालून फिरून काय होणार आहे? यांचा एका पोळीचा जीव, आणि दाबेली आणि पाणीपुरीत यांची पोट भरणार. मग रोगप्रतिकारक शक्ती नसल्यावर असाच होणार ना. मध्यंतरी माझे दोन मित्र ‘चहा’ वरून भांडत होते. एकाच म्हणण अस होत की चहा घेतल्याने तरतरीत पण येतो. आणि त्यामुळे कामात उत्साह निर्माण होतो. दुसरा मित्रच म्हणण अस होत की चहा पिण्यापेक्षा दुध घेतलेलं उत्तम. कारण दुधाने ताकद वाढते. मला विचारल्यावर मी दोघांना तुमच म्हणण बरोबर आहे अस म्हणून विषय टाळला.

पण रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या त्या केल्या तर आजार होण्याच्या शक्यता कमी होतात. आणि जरी झालाच तरी लवकर बर  होण्याच्या शक्यता वाढतात. आता दुग्धजन्य पदार्थ रोजच्या आहारात असेल तर शरीराला चांगला खुराक मिळतो. आता पुण्यात पाणीदार दुधाची परंपरा आहे. त्यात ह्या परप्रांतीयांनी दुध आणि चुना यातील फरकच नष्ट केला आहे. मुद्दा तर बाजूलाच राहिला व्यायाम आणि पुणेकर यांचा मेळ शोबाजी पुरताच असतो. पाया पक्का करण्यात कोणी रसच घेत नाही आहे. नुसत्या बांधलेल्या इमारतीची डाकडुजी करण्यातच काय शहाणपणा आहे. तुमच्यातच काही प्रतिकार शक्ती नाही आणि मग त्या गोळ्या ओषधे काय करणार? हा शंभरीचा आकडा बघून मलाच आता इतर कोणत्याही प्रश्नापेक्षा हाच खूप गंभीर प्रश्न वाटत आहे. सरकार एक वेळ अजून तेरा महिने स्थापन नाही झाल तरी काही फार नुकसान होणार नाही. पण यात आपणच आपली काळजी नाही घेतली तर शंभराच्या पुढे आणखीन एक शून्य वाढेल. स्वतःची काळजी ज्या अजून काय तुम्ही हुशार आहातच. खर तर माझ्या सारख्या मुढाने तुम्हाला अस सांगण चुकीच आहे. पण हा माझा सल्ला नाही माझ्या मनातील वेदना, म्हणजे मला तरी आपणच आपले सरकार आहोत अस वाटत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.