Category: ब्लॉग

  • राष्ट्रभाषा मराठी

    अठराव्या शतकात भारताची राष्ट्रभाषा मराठी होती. मराठेशाहीच्या टापा ज्यावेळी अफगाणिस्थानाच्या सीमेवर पडत होत्या त्यावेळी देशाचा सर्व व्यवहार मराठीमधून चालत असे. त्याकाळी नामधारी दिल्ली ही राजधानी मुघलांच्या ताब्यात होती. तर देशाचा सर्व व्यवहार तत्कालीन मराठेशाहीच्या राजधानी पुण्यातून चालत असे. पुढे ब्रिटिशांनी चाळीस वर्षे मराठ्यांशी लढून देशावर ताबा मिळाला. व देशाची शासकीय व्यवहाराची भाषा इंग्रजी झाली! मुघलांनी […]

  • तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी

    तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी ह्याच हेतूने आमच्या लाडक्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी‘ ही योजना राज्यात लागू केली. ह्या योजनेचा हेतू स्पष्ट होता. तुमचं तुम्ही बघा अन वेळेवर कर मात्र भरा. खरं तर ह्या योजनेप्रमाणे याआधीच आमच्या लाडक्या पंतप्रधानांनी ‘स्वावलंबी भारत’ नावाची योजना आणलेली. म्हणजे सरकार टाळेबंदी खेरीज काहीच करणार नाही. जनतेने आपआपले पाहावे. […]

  • फेसबुकच्या सूचना

    फेसबुकच्या पानाला पसंती द्या. मैत्रीची विनंती अशा आशयाच्या शेकडो सूचना दिवसाकाठी येतात. त्यांचे विपत्र/ईमेलच्या खचात कामाच्या गोष्टी शोधणे अवघड होते. बरं ह्या सूचना वजा विनंती आपल्याच ओळखीची लोक करत असल्याने अनेकदा नाईलाज होतो. शाळेत असतांना मला एकच मित्र होता. पुढील शिक्षणात व त्यापुढे नोकरी व्यवसायात चार पाचपेक्षा आकडा वाढला नाही. पण त्या सुमार बुध्यांक असलेल्या […]

  • मराठी भाषिकांचे प्रभावक्षेत्र

    मराठी भाषिकांचे प्रभावक्षेत्र त्यांच्या लोकसंख्येवर आधारलेले असावे. जगाची लोकसंख्या साधारण आठ अब्जच्या घरात आहे. अन मराठी भाषिकांची संख्या पंधरा कोटींच्या घरात. याचा अर्थ मराठी भाषिकांची संख्या ही जगाच्या लोकसंख्येच्या २ टक्के आहे. जितक्या प्रमाणात मराठी भाषिकांची लोकसंख्या तितकाच त्यांचा प्रभाव असायला हवा. खरं तर प्राचीन संस्कृत ग्रंथांच्या मते मराठा/मराठी याची क्षमता दहा हजार पट आहे. […]

  • कोरोनाच्या विश्वात

    कोरोनाच्या विश्वात कधीकधी इतर प्रश्न शिल्लक आहेत का असा प्रश्न पडतो. दिवसातून किमान शंभर वेळा कोरोना शब्द या न त्या कारणाने कानी पडतो. बर कोरोना सगळ्या जगाला होणार आहे हेही का कुणाच्या लक्षात येत नाही देव जाणे. त्यातून सरकारचा इतका ढिसाळ कारभार आहे की, कोरोना रुग्णांचे शेकड्यांमध्ये अंत्यसंस्कार होत आहेत. काही नदीकाठी कुत्री ओरबाडून खात […]

  • राक्षसेंद्र

    राक्षसेंद्र पेक्षा अन्य वाईट शब्द सुचेना म्हणून वापरला. मृत्यूयुग वाटावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा जगातील सर्वाधिक मोठा फटका हा निःसंशय भारताला बसलेला आहे. शक्यतो मी ह्या विषयावर बोलायचे टाळतो. पण जिथं दिवसाला चार चार हजार लोक एका साथीच्या रोगाने मरत आहेत. तिथं हा विषय कसा टाळता येणार? नियोजनशून्य अन कमालीचे बौद्धिक दारिद्रय असलेले […]

  • मराठीमय महाराष्ट्रासाठी

    मराठीमय महाराष्ट्रासाठी अनेक संकल्पना राबवता येऊ शकतात. खरंतर आपल्या साधुसंतांनी म्हटलेलं, हे विश्वची माझे घर! त्यायोगे मराठीमय विश्व हेही शक्य आहे. तूर्तास आपल्या राज्यातील मराठीच्या वापराबाबत बोलूयात! व्यावसायिक भाषा वाढते अन टिकते! आक्रमणाचे म्हणाल तर गेल्या दोन हजार वर्षांपासून महाराष्ट्रावर व मराठी संस्कृतीवर आक्रमण होत होतंच आहे. त्यामुळे आधी सगळं छान होत आणि आता ह्रास […]

  • पोलीस मित्र

    पोलीस मित्र ही काही नवीन संकल्पना नाही. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये गटाने पोलिसांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे यावर चर्चा व कृती करण्याची गरज भासत आहे. कारणे काही का असेनात अशा प्रकारचे हल्ले चुकीचेच आहे. आपल्या महाराष्ट्राची ही मुळीच संस्कृती नाही. झुंडशाही हा उत्तर भारतातील प्रकार आहे. एक दहा वीस जण मिळून एखाद्याला इतकी अमानवीय अन […]

  • एक देश एक काहीही

    एक देश एक काहीही ही आजकालच्या सत्ताधाऱ्यांचा मंत्र झाला आहे. एक देश एक ओळखपत्र, कर, शिधापत्र, निवडणूक, भाषा. अशा एक ना एक संकल्पना पुढे आणल्या गेल्या. गेल्या पाच सात वर्षात त्याचे यशापयश दिसून आले. सुरवात करू एक देश एक ओळखपत्रासोबत. आधार ओळखपत्राची तशी मूळ संकल्पना स्वर्गीय भारतरत्न वाजपेयींच्या सत्ताकाळातील. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी माजी पंतप्रधान मनमोहन […]

  • महाराष्ट्रात मराठीचा आग्रह कशासाठी?

    महाराष्ट्रात मराठीचा आग्रह कशासाठी? देश एक आहे तर सगळ्यांनीच हिंदी भाषा स्वीकारली तर काय हरकत आहे? असे एक ना अनेक महनीय विचार आपल्याला ऐकायला मिळतात. प्रथमदर्शी हे विचार पटण्याजोगे आहेत. पण मग प्रश्न असा निर्माण होतो की भारतीय राज्यघटनेत हिंदी अन इंग्रजीचा केवळ सांघिक सरकारी कार्यालयांपुरताच वापर करावा असा उल्लेख का केला असेल? का भाषावार […]

1 2 3 7
Next Page