Category: महाराष्ट्र

  • सीमाभागातील व्यथा

    सीमाभागातील व्यथा ह्या आताच्या नाहीत. प्रश्न आहे तसाच वर्षानुवर्षे ठेवणे. तो चिघळत राहावा अशी योजना करणे आपल्या राजकारण्यांचा आवडता विषय. त्यावर तोडगा निघाला तर नवीन कोणत्या विषयावर राजकारण करायचं असं कदाचित त्यांना वाटत असावे! राजकारण्यांना तरी का दोष द्यावा? मराठी भाषिकांना आजवर चुकीची माहिती देऊन ते मराठी कसे राहत नाहीत याचाच उद्योग गेली काही शतके […]

  • राष्ट्रभाषा मराठी

    अठराव्या शतकात भारताची राष्ट्रभाषा मराठी होती. मराठेशाहीच्या टापा ज्यावेळी अफगाणिस्थानाच्या सीमेवर पडत होत्या त्यावेळी देशाचा सर्व व्यवहार मराठीमधून चालत असे. त्याकाळी नामधारी दिल्ली ही राजधानी मुघलांच्या ताब्यात होती. तर देशाचा सर्व व्यवहार तत्कालीन मराठेशाहीच्या राजधानी पुण्यातून चालत असे. पुढे ब्रिटिशांनी चाळीस वर्षे मराठ्यांशी लढून देशावर ताबा मिळाला. व देशाची शासकीय व्यवहाराची भाषा इंग्रजी झाली! मुघलांनी […]

  • तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी

    तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी ह्याच हेतूने आमच्या लाडक्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी‘ ही योजना राज्यात लागू केली. ह्या योजनेचा हेतू स्पष्ट होता. तुमचं तुम्ही बघा अन वेळेवर कर मात्र भरा. खरं तर ह्या योजनेप्रमाणे याआधीच आमच्या लाडक्या पंतप्रधानांनी ‘स्वावलंबी भारत’ नावाची योजना आणलेली. म्हणजे सरकार टाळेबंदी खेरीज काहीच करणार नाही. जनतेने आपआपले पाहावे. […]

  • मराठीमय महाराष्ट्रासाठी

    मराठीमय महाराष्ट्रासाठी अनेक संकल्पना राबवता येऊ शकतात. खरंतर आपल्या साधुसंतांनी म्हटलेलं, हे विश्वची माझे घर! त्यायोगे मराठीमय विश्व हेही शक्य आहे. तूर्तास आपल्या राज्यातील मराठीच्या वापराबाबत बोलूयात! व्यावसायिक भाषा वाढते अन टिकते! आक्रमणाचे म्हणाल तर गेल्या दोन हजार वर्षांपासून महाराष्ट्रावर व मराठी संस्कृतीवर आक्रमण होत होतंच आहे. त्यामुळे आधी सगळं छान होत आणि आता ह्रास […]

  • पोलीस मित्र

    पोलीस मित्र ही काही नवीन संकल्पना नाही. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये गटाने पोलिसांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे यावर चर्चा व कृती करण्याची गरज भासत आहे. कारणे काही का असेनात अशा प्रकारचे हल्ले चुकीचेच आहे. आपल्या महाराष्ट्राची ही मुळीच संस्कृती नाही. झुंडशाही हा उत्तर भारतातील प्रकार आहे. एक दहा वीस जण मिळून एखाद्याला इतकी अमानवीय अन […]

  • महाराष्ट्रात मराठीचा आग्रह कशासाठी?

    महाराष्ट्रात मराठीचा आग्रह कशासाठी? देश एक आहे तर सगळ्यांनीच हिंदी भाषा स्वीकारली तर काय हरकत आहे? असे एक ना अनेक महनीय विचार आपल्याला ऐकायला मिळतात. प्रथमदर्शी हे विचार पटण्याजोगे आहेत. पण मग प्रश्न असा निर्माण होतो की भारतीय राज्यघटनेत हिंदी अन इंग्रजीचा केवळ सांघिक सरकारी कार्यालयांपुरताच वापर करावा असा उल्लेख का केला असेल? का भाषावार […]

  • मराठी भाषा दिन अन मराठी भाषिक

    मराठी भाषा दिन जसजसा जवळ येतो तस तसा अनेकांना मराठीचा उमाळा येतो. अन मग मराठी भाषिकांचे मराठीवर कसे प्रेम नाही. मराठी भाषिक कसा अप्पलपोटी अन मराठी शाळांमध्ये कसा आपल्या पाल्याला टाकत नाही वगैरे तत्वज्ञान झोडतील! हे दरवर्षीचे अन एका दिवसापुरते! पुढे हेच तज्ञ वर्षभर गायब असतात! साधारण एका तपापासून मी मराठीची सेवा करतो आहे! ते […]

  • महाराष्ट्राचा इतिहास

    महाराष्ट्राचा इतिहास हा जितका वैभवशाली आहे तितकाच तो अंधारातही आहे! शालेय शिक्षणात आपल्याला हा इतिहास शिकवला तर महाराष्ट्राचे भविष्य उज्वल आहे!

  • मराठीचा आग्रह कशासाठी?

    अनेकांना मराठीचा आग्रह हा राजकारण वा भावनिक आहे असा मोठ्ठा गैरसमज आहे. अन हा गैरसमज बहुतांश मराठी भाषिकांमध्ये आहे! त्यांच्यासाठी हा लेखप्रपंच!

  • बौद्धिक दुष्काळ

    बौद्धिक दुष्काळ हा इतर कोणत्याही दुष्काळापेक्षा अधिक भयावह आहे. ३७० कलमाची झिंग झिंगून सरकार इतके बेफाम झाले की महाराष्ट्रातील धरणाच्या खिडक्या उघडून मोकळे झाले. ज्याला आपण लोकशाहीचा एक आधारस्तंभ वगैरे म्हणतो. ते पत्रकारिता तर बोलायलाच नको! मुळात धरणात किती पाणीसाठा आहे. किती पाऊस झाल्यावर धरणे भरतात. ही माहिती जलसंपदा विभागाला माहित नाही असे होऊ शकत […]