-
व्यक्ती तितक्या प्रकृती
तलं तरी हेच खरं आहे. प्रत्येकाला येणारे अनुभवावरून प्रत्येकजण त्याचा दृष्टिकोन ठेवतो. कुणाला अमुक विषय महत्वाचा वाटतो. तर कुणाला अमुक मत पटत नाही. माझ्यामते ह्यात काहीच गैर नाही.
-
राक्षसेंद्र
राक्षसेंद्र पेक्षा अन्य वाईट शब्द सुचेना म्हणून वापरला. मृत्यूयुग वाटावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा जगातील सर्वाधिक मोठा फटका हा निःसंशय भारताला बसलेला आहे. शक्यतो मी ह्या विषयावर बोलायचे टाळतो. पण जिथं दिवसाला चार चार हजार लोक एका साथीच्या रोगाने मरत आहेत. तिथं हा विषय कसा टाळता येणार? नियोजनशून्य अन कमालीचे बौद्धिक दारिद्रय असलेले […]
-
पुनःश्च हरी ओम
पुनःश्च हरी ओम आता कितवा आहे ते सांगता येणार नाही. पण पुन्हा नोंदी लिहिण्याचा यत्न करणार आहे. अनेकदा ठरवूनही यात सातत्य काही येईना. ज्या गोष्टीने दशकभरापूर्वी वेड लावलेलं आज ती गोष्ट कृतीत आणण्याचा काही योग येत नाहीये. खरं तर टाळेबंदी अन कोरोनाच्या कृपेने अनेक विषय डोक्यात येतात. परंतु पूर्वी (पूर्वीचा अर्थ दहा वर्षे आधी) प्रमाणे […]
-
मोदी सावकार
काय म्हणावं मोदी सावकारांना? उठता बसता दिसता मोदी सावकार सावकारी करण्यात गुंग! गेल्या आठवड्याचीच बातमी पहा. राज्यांचा करांचा हिस्सा गेल्या दोन वर्षांपासून मोदी सावकारांनी दिलेला नाही! खूपच प्रकरण ताणलं तर पाच दहा टक्के रक्कम वर्ग करतात! आता ती रक्कम २.३ लक्ष कोटी रुपये इतकी झाली! आता कराचे दोन गोळे गट्टम केल्यावर राज्यांना कर्ज काढण्याचा उरफाटा […]
-
आत्मपरीक्षण
आत्मपरीक्षण प्रत्येकाने सातत्याने करायला हवे. त्याचा चांगला फायदा होतो. स्वतःच्या प्रत्येक गोष्टीचा त्रयस्थ व्यक्ती म्हणून केलेला अभ्यास अनेक पैलू उलगडतो. अनेकदा आपण अनेक गोष्टी बोलतो. अनेक ध्येय समोर ठेऊन काम करतो. कधी यश तर कधी अपयश मिळते. पण या पलीकडे जाऊन विचार केल्यास आपण केलेल्या कामाचे विश्लेषण अनेक चांगल्या गोष्टी दर्शविते!
-
संकट आणि आपण
संकट आणि आपण! संकट येतात आणि जातात! संकटे आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. तरीदेखील आपण संकट आले म्हणून घाबरतो! मला सांगा जगात असे कोण आहे ज्यावर कधीच संकट आले नाही? असे कोण आहे ज्याचे जीवन सुखात गेले? मुळात संकटे ही सुखाचे महत्व समजावतात व आयुष्याला नवी दिशा देतात. दिवसानंतर रात्र व रात्रीनंतर पुन्हा दिवस येतो. त्यामुळे […]
-
काटकसर
काटकसर खरं तर कठीण गोष्ट आहे. मी बऱ्याच दिवसांपासून ते शिकण्याचा प्रयत्न करतोय. काटकसर म्हणजे कंजुषी नव्हे!
-
मराठीसाठी इंग्रजी बोला
मराठीसाठी इंग्रजी बोला. कदाचित हे आपल्याला हास्यापद वाटेल. परंतु, थोडा विचार केला तर हे आपल्यालाही पटेल. इंग्रजी बोला म्हटलं की अनेकांची तंतरते! त्या गटात मी देखील मोडतो! हाहा!! मी एका आंतरराष्ट्रीय कंपनीत कामाला असतांना ज्यांचं इंग्रजी उत्तम नाही अशांना इंग्रजी शिकवण्याचा घाट घालण्यात आला. आठवड्याभरातच एक ट्रेनर कंपनी सुटल्यानंतर एक पन्नास लोकांच्या गटाला इंग्रजी बोलण्याच्या […]
-
सायकल
सायकल चालवणं तस नवीन नाही. बऱ्याच दिवसांपासून ठरवलेलं. परंतु अनियमितता होती. शेवटी गेल्या दोन दिवसांपासून सायकलपुराण सुरु झालं.
-
ट्विटरवरील खात्याच्या निलंबनाबाबत!
ट्विटरवरील खात्याच्या निलंबनाबाबत माझे मत! कोणत्याही मुद्याला दोन बाजू असतातच. प्रत्येकजण आपली मते आपल्या अनुभवावरून बनवतो! त्यामुळे कोणतीही बाजू चुकीची नसते! असे निदान मी तरी मानतो!