Category: राजकारण

  • तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी

    तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी ह्याच हेतूने आमच्या लाडक्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी‘ ही योजना राज्यात लागू केली. ह्या योजनेचा हेतू स्पष्ट होता. तुमचं तुम्ही बघा अन वेळेवर कर मात्र भरा. खरं तर ह्या योजनेप्रमाणे याआधीच आमच्या लाडक्या पंतप्रधानांनी ‘स्वावलंबी भारत’ नावाची योजना आणलेली. म्हणजे सरकार टाळेबंदी खेरीज काहीच करणार नाही. जनतेने आपआपले पाहावे. […]

  • राक्षसेंद्र

    राक्षसेंद्र पेक्षा अन्य वाईट शब्द सुचेना म्हणून वापरला. मृत्यूयुग वाटावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा जगातील सर्वाधिक मोठा फटका हा निःसंशय भारताला बसलेला आहे. शक्यतो मी ह्या विषयावर बोलायचे टाळतो. पण जिथं दिवसाला चार चार हजार लोक एका साथीच्या रोगाने मरत आहेत. तिथं हा विषय कसा टाळता येणार? नियोजनशून्य अन कमालीचे बौद्धिक दारिद्रय असलेले […]

  • एक देश एक काहीही

    एक देश एक काहीही ही आजकालच्या सत्ताधाऱ्यांचा मंत्र झाला आहे. एक देश एक ओळखपत्र, कर, शिधापत्र, निवडणूक, भाषा. अशा एक ना एक संकल्पना पुढे आणल्या गेल्या. गेल्या पाच सात वर्षात त्याचे यशापयश दिसून आले. सुरवात करू एक देश एक ओळखपत्रासोबत. आधार ओळखपत्राची तशी मूळ संकल्पना स्वर्गीय भारतरत्न वाजपेयींच्या सत्ताकाळातील. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी माजी पंतप्रधान मनमोहन […]

  • मोदी सावकार

    काय म्हणावं मोदी सावकारांना? उठता बसता दिसता मोदी सावकार सावकारी करण्यात गुंग! गेल्या आठवड्याचीच बातमी पहा. राज्यांचा करांचा हिस्सा गेल्या दोन वर्षांपासून मोदी सावकारांनी दिलेला नाही! खूपच प्रकरण ताणलं तर पाच दहा टक्के रक्कम वर्ग करतात! आता ती रक्कम २.३ लक्ष कोटी रुपये इतकी झाली! आता कराचे दोन गोळे गट्टम केल्यावर राज्यांना कर्ज काढण्याचा उरफाटा […]

  • कोरोनापेक्षा टाळेबंदी वाईट

    कोरोनापेक्षा टाळेबंदी वाईट! अन हेच सत्य आहे! हो मी आजच्या केंद्र सरकारच्या एकूणच संवेदना शून्य दिशाहीन हुकूमशाही कारभार बद्दल बोलत आहे. टाळेबंदी ज्या लोकांसाठी केली त्यांचेच जीव ह्या टाळेबंदीमुळे जाणार असतील तर कोरोनापेक्षा टाळेबंदी वाईट! खरं तर राजकीय विषयावर बोलून आपल्याकडे काडीमात्रही फरक पडत नाही! परंतु तरीही ह्या निर्जीव अन निद्रिस्त समाजाला सांगण्यासाठी नव्हे तर […]

  • मध्यमवर्गीय

    जगातील सर्वात तुच्छ जीव म्हणजे मध्यमवर्गीय. हा तुच्छ जीव पूर्वी चाळीचाळीत सापडायचा. आता गृहसंकुलात सापडतो. ह्या जीवाची घाणेरडी सवय म्हणजे हा जीव आपल्या अडचणींना आपले भाग्य समजतो!

  • दुष्काळ राजकीय इच्छाशक्तीचा

    खरा दुष्काळ राजकीय इच्छाशक्तीचा आहे. सोपं उदाहरण देतो. २००८ साली मुंबई हल्ला झाला. भयंकर चर्चा झाली. अनेकजण मारले गेले. त्यात पोलीस देखील होते.

  • दुष्काळ आणि राष्ट्रीय नदीजोड प्रकल्प

    दुष्काळ पडू नये म्हणून राष्ट्रीय नदी जोड प्रकल्प भारतासाठी खूप महत्वाचा आहे. आपल्या देशात एकवेळ पाऊस येईल की नाही याबाबत साशंकता असेल पण दुष्काळ अगदी पक्का असतो. यावेळी तर हिवाळ्यातच महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाला.

  • लोकशाही फक्त नावाची

    लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य. पूर्वी आदिलशाही, निजामशाही वगैरे होत्या. त्यावेळी आदिल शहा, निजाम वगैरे राज्य करीत होते. आता लोकशाही आहे. पण खरंच लोकांचं राज्य आहे?

  • मराठीची सक्ती

    महाराष्ट्रात शालेय शिक्षणात मराठीची सक्ती करावी वा न कारवाई यावर सध्याला चर्चा सुरु आहे. काहींच्या मते अल्पसंख्याक शाळांना ती नको आहे. काहींचा तर स्पष्ट विरोध देखील आहे. काहीजण असेही म्हणत आहेत की मराठी माणूसच मराठी नको म्हणतो.