Category: विचार

  • सीमाभागातील व्यथा

    सीमाभागातील व्यथा ह्या आताच्या नाहीत. प्रश्न आहे तसाच वर्षानुवर्षे ठेवणे. तो चिघळत राहावा अशी योजना करणे आपल्या राजकारण्यांचा आवडता विषय. त्यावर तोडगा निघाला तर नवीन कोणत्या विषयावर राजकारण करायचं असं कदाचित त्यांना वाटत असावे! राजकारण्यांना तरी का दोष द्यावा? मराठी भाषिकांना आजवर चुकीची माहिती देऊन ते मराठी कसे राहत नाहीत याचाच उद्योग गेली काही शतके […]

  • मराठी कालगणना

    मराठी कालगणना पुन्हा वापरात आणणे आवश्यक आहे. आपण मराठी आहोत. आणि आपली संस्कृती मराठी आहे. पण आपण आपली संस्कृती खऱ्या अर्थाने पाळतो का?

  • राक्षसेंद्र

    राक्षसेंद्र पेक्षा अन्य वाईट शब्द सुचेना म्हणून वापरला. मृत्यूयुग वाटावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा जगातील सर्वाधिक मोठा फटका हा निःसंशय भारताला बसलेला आहे. शक्यतो मी ह्या विषयावर बोलायचे टाळतो. पण जिथं दिवसाला चार चार हजार लोक एका साथीच्या रोगाने मरत आहेत. तिथं हा विषय कसा टाळता येणार? नियोजनशून्य अन कमालीचे बौद्धिक दारिद्रय असलेले […]

  • मराठी भाषा दिन अन मराठी भाषिक

    मराठी भाषा दिन जसजसा जवळ येतो तस तसा अनेकांना मराठीचा उमाळा येतो. अन मग मराठी भाषिकांचे मराठीवर कसे प्रेम नाही. मराठी भाषिक कसा अप्पलपोटी अन मराठी शाळांमध्ये कसा आपल्या पाल्याला टाकत नाही वगैरे तत्वज्ञान झोडतील! हे दरवर्षीचे अन एका दिवसापुरते! पुढे हेच तज्ञ वर्षभर गायब असतात! साधारण एका तपापासून मी मराठीची सेवा करतो आहे! ते […]

  • प्रदूषण

    प्रदूषण खरं तर शालेय जीवनापासून एक रटाळ विषय! त्यावर पुन्हा काय बोलायचं? पण त्याचे आपल्या दैनंदिन जीवनावर फार मोठा परिणाम होतो. हे मी अनुभवाने सांगत आहे! फार काय बोलायचं! पाच एक वर्षांपूर्वीपर्यंत पुण्यात फिरतांना फक्त ऊन जाणवायचं! आता त्यासोबत धूर आणि धूळ जाणवते! सर्वेक्षणाअंती सर्व पुणेकर दिवसाला पाच सिगारेट ओढल्यावर जमा होईल इतका धूर घेतात […]

  • कोरोनापेक्षा टाळेबंदी वाईट

    कोरोनापेक्षा टाळेबंदी वाईट! अन हेच सत्य आहे! हो मी आजच्या केंद्र सरकारच्या एकूणच संवेदना शून्य दिशाहीन हुकूमशाही कारभार बद्दल बोलत आहे. टाळेबंदी ज्या लोकांसाठी केली त्यांचेच जीव ह्या टाळेबंदीमुळे जाणार असतील तर कोरोनापेक्षा टाळेबंदी वाईट! खरं तर राजकीय विषयावर बोलून आपल्याकडे काडीमात्रही फरक पडत नाही! परंतु तरीही ह्या निर्जीव अन निद्रिस्त समाजाला सांगण्यासाठी नव्हे तर […]

  • मध्यमवर्गीय

    जगातील सर्वात तुच्छ जीव म्हणजे मध्यमवर्गीय. हा तुच्छ जीव पूर्वी चाळीचाळीत सापडायचा. आता गृहसंकुलात सापडतो. ह्या जीवाची घाणेरडी सवय म्हणजे हा जीव आपल्या अडचणींना आपले भाग्य समजतो!

  • एक देश एक भाषा संकल्पना

    एक देश एक भाषा संकल्पना ही मुळातच भारतीय नाही. एका जर्मन तत्वज्ञ जोहान गोटलिब सतराव्या शतकात मांडली. व तिला अधिकृत स्वरूप मिळवून दिले. दुवा- https://babelzine.co.uk/wp-content/uploads/2018/11/No25-Article-Language-and-nationalism.pdf

  • दुष्काळ राजकीय इच्छाशक्तीचा

    खरा दुष्काळ राजकीय इच्छाशक्तीचा आहे. सोपं उदाहरण देतो. २००८ साली मुंबई हल्ला झाला. भयंकर चर्चा झाली. अनेकजण मारले गेले. त्यात पोलीस देखील होते.

  • काटकसर

    काटकसर खरं तर कठीण गोष्ट आहे. मी बऱ्याच दिवसांपासून ते शिकण्याचा प्रयत्न करतोय. काटकसर म्हणजे कंजुषी नव्हे!